ETV Bharat / state

पालघर येथे बनावट नोटा देऊन भाजी घेण्याचा बेत फसला - Lakshmibai Shirashat Forged Note Case Palghar

वृद्ध लक्ष्मीबाई शिरसाठ या शहर भाजी मार्केटमध्ये भाजी विक्री करत होत्या. त्यादरम्यान संजय गुप्ता नामक एका व्यक्तीने त्यांच्याकडून भाजी विकत घेतली व त्यांना १०० रुपयाची नोट दिली.

बनावट नोटा देऊन भाजी घेणारा संजय गुप्ता
author img

By

Published : Sep 23, 2019, 12:18 PM IST

पालघर- शहरातील भाजी मार्केट येथे बनावट नोटा देऊन भाजी खरेदी करणाऱ्या व्यक्तीला पालघर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संजय गुप्ता असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याला भाजी मार्केटमधील साईबाबा मंदिर येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भाजी मार्केटमधील दोन भाजी विक्रेत्यांना त्याने १०० रुपयांच्या खोट्या नोटा देऊन गंडा घातला आहे.

पालघर येथे बनावट नोटा देऊन भाजी घेण्याचा बेत फसला

वृद्ध लक्ष्मीबाई शिरसाठ या शहर भाजी मार्केटमध्ये भाजी विक्री करत होत्या. त्यादरम्यान संजय गुप्ता नामक एका व्यक्तीने त्यांच्याकडून भाजी विकत घेतली व त्यांना १०० रुपयाची नोट दिली. दिलेली नोट खोटी असल्याच्या संशयावरून लक्ष्मीबाई यांनी ती नोट आपल्या मुलाला दाखविली. ही नोट खोटी असल्याचे समजल्यानंतर त्यांनी संजय गुप्ताला पकडून ठेवले. त्यानंतर सदर प्रकरणाबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.

हेही वाचा- मुसळधार पावसाने कापणीला आलेल्या भातपिकाच्या नासाडीची भिती

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संजय गुप्ताला ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता, पोलिसांना त्याच्याकडे १००, २००, ५०० च्या अनेक बनावट नोटा आढळल्या. या प्रकरणात लाखो रूपयांच्या बनावट नोटा पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पालघर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Intro:पालघर भाजी मार्केट येथे बनावट नोटा देऊन भाजी खरेदी करणाऱ्या संजय गुप्ता याला पालघर पोलिसांनी घेतले ताब्यात; त्याच्याकडे 100, 200, 500 च्या अनेक बनावट नोटा आढळल्या, लाखो रुपयांच्या बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यताBody:पालघर भाजी मार्केट येथे बनावट नोटा देऊन भाजी खरेदी करणाऱ्या संजय गुप्ता याला पालघर पोलिसांनी घेतले ताब्यात; त्याच्याकडे 100, 200, 500 च्या अनेक बनावट नोटा आढळल्या, लाखो रुपयांच्या बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता

नमित पाटील,
पालघर, दि. 23/9/2019

    पालघर भाजी मार्केट येथे बनावट नोटा देऊन भाजी खरेदी करणाऱ्या व्यक्तीला पालघर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संजय गुप्ता असे या व्यक्तीचे नाव असून पालघर भाजी मार्केट मध्ये साईबाबा मंदिर येथुन पोलिसांनी ताब्यात घेतले. भाजी मार्केटमधील दोन भाजी विक्रेत्यांना त्याने 100 रूपयांच्या खोट्या नोटा देऊन गंडा घातला.  

       पालघर भाजी मार्केटमध्ये रविवारी रात्री  लक्ष्मीबाई शिरसाठ या वृद्ध महिलेकडून भाजी खरेदी करून या महिलेलाल संजय गुप्ता नामक एका व्यक्तीने 100 रुपयाची नोट दिली. 100 रुपयाची ही नोट खोटी असल्याचा महिलेला संशय आल्यानंतर तिने ही नोट आपल्या मुलाला दाखवली. ही नोट खोटी असल्याचे समजल्यानंतर  त्यांनी या व्यक्तीला पकडून ठेवले. त्यानंतर बोलवून या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिले. 15 दिवसपूर्वी अशाच एका व्यक्तीने बाजारात अशाप्रकारे भाजी खरेदीच्या नावाने 100 रुपयाच्या अशा अनेक नोटा बदलल्या असल्याचे समजते. 

      घटनास्थळी जाऊन पालघर पोलिसांनी या संजय गुप्ता याला ताब्यात घेतले व  त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे 100, 200, 500 च्या अनेक बनावट नोटा आढळल्या आहेत. या प्रकरणात लाखो रूपयांच्या बनावट नोटा पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पालघर पोलीस अधिक तपास  करीत आहेत.

Byte
लक्ष्मीबाई शिरसाठ- भाजीविक्रेती महिला

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.