ETV Bharat / state

पती हरवल्याचा पत्नीचा बनाव उघड, प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या - palghar

पती हरवल्याचा बनाव करत पोलिसांत तक्रार करून पत्नी व तिच्या प्रियकराने मिळून पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बोईसर येथे उघडकीस आला आहे.

author img

By

Published : Feb 22, 2019, 9:44 PM IST

पालघर- पती हरवल्याचा बनाव करत पोलिसांत तक्रार करून पत्नी व तिच्या प्रियकराने मिळून पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बोईसर येथे उघडकीस आला आहे. अनिल कुमार रावत (३२) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपी पत्नी ममता रावत आणि प्रियकर सोनू (२२) दोघांनाही बोईसर पोलिसांनी अटक केली आहे.

मृत अनिल कुमार रावत हा पालघर येथील एका कंपनीत सुपरवायझरचे काम करत होता. १५ फेब्रुवारी रोजी अनिलची पत्नी ममता हिने बोईसर पोलीस ठाणे गाठत आपला पती २ दिवसांपासून घरी आला नसल्याची तक्रार नोंदवली. याच दरम्यान बोईसर येथील जंगलामध्ये एका अज्ञात इसमाचा मृतदेह पोलिसांना सापडला. मृतदेहाची ओळख पटत नसल्याने शोध घेणे अवघड होते.

काही दिवसांपूर्वीच ममता हिने आपला पती हरविल्याची तक्रार बोईसर पोलिसांत दिली होती. त्यामुळे जंगलात सापडलेल्या मृतदेहाचा व पती हरवल्याच्या तक्रारीचा काही संबंध आहे का ? याची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी ममता हिला मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी बोलावले. यावेळी ममताने हा मृतदेह आपल्या पतीचाच असल्याचे सांगितले. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात कलम ३०२ आणि २०१ अन्वये गुन्हा दाखल केला.

undefined

या हत्येप्रकरणी पोलिसांना अनिलची पत्नी ममतावर संशय होता. तसेच सोनू हा अनिलचा दूरचा नातेवाईक गेल्या ३ महिन्यांपासून त्यांच्या घरी राहण्यास आला होता. त्याच्यावरही पोलिसांचा संशय होता. या ३ महिन्यांदरम्यान ममता आणि सोनू यांच्यात जवळीक वाढली होती. मात्र, त्यांच्या अनैतिक संबंधास पती अनिल याचा अडथळा येत होता. त्यामुळे त्यांच्या अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या पती अनिल याच्या हत्येचा दोघांनी मिळून कट रचला होता. हत्या करुन मृतदेह बोईसर येथील जंगलात टाकून दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले.

Intro: पती हरवल्याचा बनाव करत पोलिसांत मिसिंगची तक्रार करून पत्नी व तिच्या प्रियकराने केली पतीची हत्याBody:
पती हरवल्याचा बनाव करत पोलिसांत मिसिंगची तक्रार करून पत्नी व तिच्या प्रियकराने केली पतीची हत्या

नमित पाटील,

पालघर, दि. 22/2/2019

पती हरवल्याचा बनाव करत पोलिसांत मिसिंगची तक्रार करून पत्नी व तिच्या प्रियकराने मिळून पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बोईसर येथे उघडकीस आला आहे. अनिल कुमार रावत (32) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून आरोपी पत्नी ममता रावत आणि प्रियकर सोनू (22) अशी आरोपींची नावे आहेत. बोईसर पोलिसांनी पत्नी व प्रियकर या दोघांनाही अटक केली आहे.

मृत अनिल कुमार रावत हा पालघर येथील एका कंपनीत सुपरवायझरचे काम करत होता. 15 फेब्रुवारी अनिलची पत्नी ममता हिने बोईसर पोलीस ठाणे गाठत आपला पती दोन दिवसांपासून घरी आला नसल्याची तक्रार नोंदवली. याच दरम्यान बोईसर येथील जंगलामध्ये एका अज्ञात इसमाचा मृतदेह पोलिसांना सापडला. मृतदेहाची अवस्था खराब असल्याने त्याची ओळख पटत नव्हती त्यामुळे हा मृतदेह कुणाचा याचा शोध घेणे अवघड होते.

काही दिवसांपूर्वीच ममता हिने आपला पती हरवल्याची तक्रार बोईसर पोलिसांत दिली होती. त्यामुळे जंगलात सापडलेल्या मृतदेहाचा व पती हरवला असल्याच्या प्रकरणाचा काही संबंध आहे का ? याची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी ममता हिला मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी बोलावले. यावेळी ममताने हा मृतदेह आपल्या पतीचाच असल्याचे सांगितले. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात कलम 302 आणि 201 अन्वये गुन्हा दाखल केला.

या हत्येप्रकरणी पोलिसांना अनिलची पत्नी ममता हिच्यावर दाट संशय होता. सोनू हा अनिलचा दूरचा नातेवाईक गेल्या तीन महिन्यांपासून त्यांच्या घरी राहण्यास आला होता. त्याच्यावरही पोलिसांचा संशय होता. या तीन महिन्यांदरम्यान ममता आणि सोनू यांच्यात जवळीक वाढली मात्र त्यांच्या अनैतिक संबंधास पती अनिल याचा अडथळा येत होता. त्यामुळे त्यांच्या अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या पती अनिल याच्या हत्येचा पत्नी व प्रियकर या दोघांनी मिळून त्याच्या कट रचला व त्याची हत्या केली व त्याचा मृतदेह बोईसर येथील जंगलात टाकून दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.