ETV Bharat / state

दमदार पाऊस, धामणी व कवडास धरणांतून सूर्या नदीत 20 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग - monsoon in palghar

संपूर्ण जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून डहाणूसह इतर भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील नदी-नाले ओसंडून वाहत असून सर्व धरणांत मुबलक पाणीसाठा तयार झालाय.

heavy rainfall in palghar
दमदार पाऊस...धामणी व कवडास धरणांतून सूर्या नदीत 20 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग
author img

By

Published : Aug 18, 2020, 9:55 AM IST

पालघर - संपूर्ण जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून डहाणूसह इतर भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील नदी-नाले ओसंडून वाहत असून सर्व धरणांत मुबलक पाणीसाठा तयार झालाय. सूर्या प्रकल्पाच्या धामणी आणि कवडास या दोन्ही धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धमणी धरणाचे तीन दरवाजे 70 सेंटीमीटरपर्यंत उघडण्यात आले असून त्यातून 7 हजार 241.37 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर धामणी आणि कवडास या दोन्ही धरणांतून सूर्या नदीत 20 हजार 103 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे सूर्या नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दमदार पाऊस...धामणी व कवडास धरणांतून सूर्या नदीत 20 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग
जिल्ह्यातील सूर्या प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या धामणी व कवडास या दोन धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने शेतीसाठी धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या धरणांतून वसई- विरार महानगरपालिका, पालघर, डहाणू शहर, डहाणू-अदानी विद्युत प्रकल्प, बोईसर, तारापूर औद्योगिक क्षेत्र आदींसह इतरत्र पाणीपुरवठा केला जातो.
heavy rainfall in palghar
संपूर्ण जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून डहाणूसह इतर भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे.

हवामान खात्याने पश्चिम महाराष्ट्रासह पालघर, मुंबई आणि संपूर्ण किनारपट्टी भागात पुढील चोवीस तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतली नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.