ETV Bharat / state

'ईटीव्ही भारत' विशेष - वारली चित्रकलेच्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृती - कोरोनाबाबत जनजागृती पालघर

आदिवासी बांधवांमध्ये कोरोनासंदर्भात अनेक गैरसमज तसेच भीती आहे. हे गैरसमज आणी भीती दूर करण्याचे काम चित्रकारांनी वारली चित्रकलेच्या माध्यमातून केले आहे. लक्षणे दिसल्यास कोरोना चाचणी तसेच लसीकरणाचा संदेश चित्रकलेच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

वारली चित्रकलेच्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृती

author img

By

Published : May 28, 2021, 7:20 PM IST

पालघर - आदिवासी बांधवांमध्ये कोरोनासंदर्भात अनेक गैरसमज तसेच भीती आहे. हे गैरसमज आणी भीती दूर करण्याचे काम चित्रकारांनी वारली चित्रकलेच्या माध्यमातून केले आहे. लक्षणे दिसल्यास कोरोना चाचणी तसेच लसीकरणाचा संदेश चित्रकलेच्या माध्यमातून देण्यात आला आहे. ११ वीत शिकणाऱ्या तन्वी वरठा, सुचिता कामडी या दोन विद्यार्थीनींनी आदिवासी बोली भाषेचा वापर करून, साकारलेल्या वारली चित्रांमुळे आदिवासी समाजात कोरोनाविषयी जनजागृती निर्माण होण्यास मदत होत आहे.

पालघर जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा असून, आदिवासी समाजात कोरोना आजाराविषयी भिती आणि गैरसमज आहेत. त्यामुळे ते अनेकवेळा कोरोनाचे लक्षणे दिसत असून सुद्धा डॉक्टरकडे जात नाहीत. तसेच अनेक वेळा निदान न झाल्याने चुकीच्या पद्धतीने उपचार केले जातात. यातून हा आजार बळावतो. त्याचप्रमाणे कोरोना लसीकरणावरून देखील आदिवासी समाजात अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे कोरोना लसीकरणाला देखील फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

वारली चित्रकलेच्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृती

वारली चित्रांच्या माध्यमातून जनजागृती

याच पार्श्वभूमीवर आदिवासी समाजामध्ये कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी तन्वी वरठा, सुचिता कामडी यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी जनजागृतीचे माध्यम म्हणून वारली शैलीतील चित्रकला निवडली आहे. या चित्रांच्या माध्यमातून त्या आदिवासी लोकांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती करत आहेत. तसेच लसीकरणाचे देखील महत्त्व समजावून सांगत आहेत.

हेही वाचा - अपोलो हॉस्पिटल्समध्ये 'स्पूटनिक व्ही'चे लसीकरण; 1195 रुपये प्रति डोसची किंमत!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.