पालघर - कोरोना काळात मोठ्या शहरांमध्ये घर खरेदीचे पॅटर्न आता बदलले आहे. आता लोक गर्दीच्या ठिकाणी घरे घेण्यास नकार देत आहे. त्यामुळे डेव्हलपर्सने देखील शहराबाहर घरे तयार करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना महामारीची पार्श्वभूमी लक्षात घेता, लोक शहराबाहेर सुरक्षिततेसाठी घरे घेण्याचा विचार करत असल्याचे प्रॉपर्टी कन्सल्टंट एनरॉकच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
शहराबाहेर घरे घेण्याच्या प्रमाणात वाढ
कोरोना नंतर शहराबाहेर घरे घेण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. तर दुसरीकडे, मुंबई मेट्रोपॉलिटन रीजनने (एमएमआर)मध्ये पनवेल, पालघर, वसई, विरार, बदलापूर, भिवंडी आणि डोंबिवली या शहरांमध्ये 67% नवीन घरे लॉन्च केले आहेत. गेल्या आर्थिक वर्षात ही आकडेवारी 60% होती. मुंबईपासून काही अंतरावर पालघर जिल्हा आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भाग निसर्ग, समुद्र आणि नद्यांनी नटलेला आहे. हा जिल्हा आदिवासी बहुल आहे. त्यामुळे मुंबईतील नागरिकांनी गर्दी व कोरोना टाळण्यासाठी व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पालघर, बोईसर, सफाळे, वाडा शहरापासून काही अंतरावर घर घेण पसंत केले आहे.
डेव्हलपर्समार्फत ग्रामीण भागात व शहरांबाहेर घरांची उभारणी
कोरोना महामारीची पार्श्वभूमी लक्षात घेतल्यास भविष्यातील घरे खरेदीची पद्धत बदलत आहे. कारण लोक आता आरोग्य सुरक्षितेतला पसंती देत आहेत. त्यामुळे या वर्षात जास्तीत जास्त घरांची खरेदी शहराबाहेर केली जात आहे. आता ग्राहक ई-स्कूलींग, घरातून काम आणि सुरक्षेच्या दृष्टीने घर विकत घेत आहेत. अशा परिस्थितीत विकसक घर खरेदीदारांची मागणी लक्षात घेऊनही ग्रामीण भागात, शहरांबाहेर घरांची उभारणी करत असल्याचे दिसून येत आहे.
शहराबाहेर घर घेऊन राहणे ग्राहकांच्या पसंतीत
एकूणच गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने थैमान मांडले असल्याने शहरातील कोरोनाचे वाढते प्रमाण व वाढती गर्दी यामुळे नागरिकांनी आता आपला कल ग्रामीण भागाकडे वळवला आहे. शहारापासून दूर, सोयीस्कर, परवडणारे अशा ग्रामीण भागात विकासकाने उभारलेल्या घरामध्ये राहणे पसंद आणि सुरक्षित वाटत असल्याचे एकंदरीत समोर आले आहे.
हेही वाचा - विरोधकांच्या भीतीमुळे पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचे - चंद्रकांत पाटील