ETV Bharat / state

बहिणीने आत्महत्या केल्याच्या रागातून मेहुण्याने केली भाऊजीची हत्या

author img

By

Published : Oct 15, 2019, 9:32 AM IST

बहिणीने आत्महत्या केल्याच्या रागातून मेहुण्याने बहिणीच्या पतीवर धारधार सुऱ्याने वार केल्याची घटना नालासोपाऱ्यात घडली. हा प्रकार पालघर जिल्ह्यातील नालासोपारा पोलीस ठाण्यात घडल्याने पोलीस ठाण्यामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

नालासोपारा पोलीस ठाणे

पालघर - बहिणीने आत्महत्या केल्याच्या रागातून मेहुण्याने बहिणीच्या पतीवर धारधार सुऱ्याने वार केल्याची घटना घडली. या घटनेत आकाश कोळेकर (वय, 24) याचा मृत्यू झाला. आरोपी रवींद्र काळेल (सातारा) याला पोलिसांनी अटक केली आहे.

बहिणीने आत्महत्या केल्याच्या रागातून मेहुण्याने केली पतीची हत्या

हा प्रकार पालघर जिल्ह्यातील नालासोपारा पोलीस ठाण्यात घडल्याने पोलीस ठाण्यामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यामुळे कायदा व सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नालासोपाऱ्यातील कोमल आणि आकाश कोळेकर यांचे दीड वर्षापूर्वी लग्न झाले होते. गरोदर कोमलने रविवारी गळफास घेवून आत्महत्या केली.

हेही वाचा - मुंबई चक्काजाम करण्याचा वंचित बहुजन आघाडीचा निर्धार

कोमलचा पती आकाश कोळेकर याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलवले. बहिणीच्या आत्महत्येचा राग धरून आरोपी राजेंद्र काळेल याने पोलीस ठाण्यातच धारधार शस्त्राने वार केले. पोलिसांनी जखमी आकाशला तत्काळ रिद्धी-सिद्धी रूग्णालयात दाखल केले मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मयत आकाश कोळेकर रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत होता. तर आरोपी राजेंद्र काळेल हा महाराष्ट्र सिक्युरीटी फोर्समध्ये कामाला आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती अप्पर पोलिस अधिक्षक विजयकांत सागर यांनी दिली.

Intro:बहिणने आत्महत्या केली आणि मेव्हण्याने भावोजीला  संपवले पोलिस ठाण्यात प्रकार घडला  आणि पोलिस ठाण्यातील  कायदासुव्यवस्था धोक्यात? पालघर (वाडा) संतोष पाटील  बहीणीने आत्महत्या केल्याच्या रागातून मेव्हण्याने  बहिणच्या पतीवर धारधार सु-याने गळ्यावर वार केले.यात आकाश कोळेकर वय 24 याला नालासोपारातील रिद्धी सिद्धी रूग्णालयात दाखल केले माञ त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.यातील आरोपी रविंद्र काळेल (सातारा) याला पोलिसांनी अटक केली आहे.हा प्रकार पालघर जिल्ह्य़ातील नालासोपारा पोलिस ठाण्यात घडल्याने पोलिस ठाण्यामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर हा प्रकार दिवसाढवळ्या चक्क पोलिस ठाण्यातच घडल्याने पोलिस स्टेशन मधील कायदा व सुव्यवस्थेचे या प्रकारामुळे तीन तेरा वाजले आहेत. नालासोपारातील कोमल आणि आकाश कोळेकर यांचे दिड वर्षापुर्वी लग्न झाले होते.कोमल ही गरोदर असताना तीने रविवारी गळफासाने आत्महत्या केली. सोमवारी तीचे पती आकाश कोळेकर याला पोलिसांनी चौकशी बोलवले असता बहिणीची आत्महत्या याचा राग धरून आरोपी राजेंद्र काळेल दुपारी पोलिस ठाण्यायातच धारधार शस्त्राने हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय.मयत आकाश कोळेकर रिक्षा चालविण्याचा  धंदा करीत होता.तर आरोपी राजेंद्र काळेल हा महाराष्ट्र सिक्युरीटी फोर्स मध्ये कामाला आहे.ही हत्या कोणत्या कारणामुळे केली याचा तपास चालू असल्याचे पोलिसांनकडुन सागितले जाते. अप्पर पोलिस अधिक्षक विजयकांत सागर

Body:वीडियो

Conclusion:ओके
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.