ETV Bharat / state

रिकामी सिलिंडर्स उपलब्ध करा; आमदार हितेंद्र ठाकूर यांचे गॅस कंपन्यांना आवाहन - Palghar corona news

पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील सिप्ला या कंपनीत उत्पादित होणारे रेमडेसीवीर इंजेक्शन पालघर जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाला केले आहे.

Mla hitendra thakur
आमदार हितेंद्र ठाकूर
author img

By

Published : Apr 20, 2021, 10:39 PM IST

पालघर - वसई-विरारमध्ये मध्यंतरी ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे बर्‍याच रूग्णांचा मृत्यू झाला होता. या गंभीर घटनेनंतर प्रशासकीय प्रयत्नातून पालघर जिल्ह्याला मुबलक प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध झाला. मात्र, आता ऑक्सिजन मुबलक असताना पालघर जिल्ह्यात रिकाम्या सिलिंडरचा तुटवडा भासू लागला आहे. या रिकाम्या सिलिंडरचा वसईतील पालिकेच्या व खासगी इस्पितळांना तातडीने पुरवठा व्हावा, अशी मागणी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केली आहे. तसेच रिकामी सिलिंडर्स उपलब्ध करा, असे आवाहनही त्यांनी गॅस कंपन्यांना केले आहे.

याबरोबरच पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील सिप्ला या कंपनीत उत्पादित होणारे रेमडेसीवीर इंजेक्शन पालघर जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाला केले आहे.

वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी वसईतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आपल्या विवा महाविद्यालयात ५० खाटांचे कोविड सेंटर उभारले आहे. तसेच उपचार घेणार्‍या रूग्णांना सकस आहारदेखील उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला आहे.

मध्यंतरी काही दिवसांपूर्वी वसई-विरारमधील कोरोना रूग्णांची आकडेवारी आणि त्यानुसार लागणारा ऑक्सिजन पुरवठा कमी पडत असल्याने नागरिकांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासनाने तातडीने वसईकरांसाठी ऑक्सिजन पुरवठा करण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, आता ऑक्सिजन मुबलक असताना रिकाम्या सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागल्याने ही निकड भागवण्यासाठी आमदार ठाकूर यांनी गॅस कंपन्यांना आवाहन केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.