ETV Bharat / state

बाळासाहेब पाटील यांनी स्वीकारला पालघर पोलीस अधीक्षकपदाचा पदभार

author img

By

Published : Jun 9, 2022, 6:44 PM IST

डॅशिंग व कर्तव्यदक्ष अधिकारी अशी ओळख असलेल्या बाळासाहेब पाटील यांनी गुरुवारी पालघर पोलीस अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारला. तर मावळते पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना यावेळी निरोपही देण्यात आला. शिंदे यांची ठाणे शहर पूर्व प्रादेशिक विभागाच्या अपर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली असून पालघर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील हे सुद्धा ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त म्हणून कार्यभार पूर्ण करून आले आहेत.

Balasaheb Patil
Balasaheb Patil

पालघर - डॅशिंग व कर्तव्यदक्ष अधिकारी अशी ओळख असलेल्या बाळासाहेब पाटील यांनी गुरुवारी पालघर पोलीस अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारला. तर मावळते पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना यावेळी निरोपही देण्यात आला. शिंदे यांची ठाणे शहर पूर्व प्रादेशिक विभागाच्या अपर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली असून पालघर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील हे सुद्धा ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त म्हणून कार्यभार पूर्ण करून आले आहेत. त्यामुळे ठाणे-पालघर आयुक्तालयातील दोन बड्या अधिकाऱ्यांची अदलाबदल ही पोलीस दलातील चर्चेचा विषय बनली आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालयात वाहतूक शाखेचे उपायुक्त म्हणून काम पाहणाऱ्या बाळासाहेब पाटील यांनी याआधी महामार्ग वाहतूक विभागात काम केले होते. तसेच ठाणे पोलीस आयुक्तालयातील कळवा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणूनही पाटील यांनी धुरा सांभाळली होती. ठाणे शहरामधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक शाखेचे उपायुक्त म्हणून पाटील यांनी विविध यशस्वी प्रयोग केले. त्यातही महत्वाकांक्षी कोपरी उड्डाणपुलाच्या व तिसऱ्या कळवा खाडीपुलाच्या कामादरम्यान पाटील यांच्या नियोजनामुळे ठाणेकरांची मोठ्या कोंडीतून मुक्तता झाली होती. नुकताच ठाण्यामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आलेला 'मॉर्निग वॉक प्लाझा' हा उपक्रमही प्रचंड गाजला. त्यामुळे अशाच पद्धतीतील नवनवीन उपक्रम व कायदा - सुव्यवस्था राखण्यात बाळासाहेब पाटील यशस्वी होतील, अशी पालघरवासियांना आशा आहे. आज पाटील यांनी पालघरचे मावळते पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्याकडून पदभार स्वीकारला असून पालघरवासियांना त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

हेही वाचा - Rajya Sabha Elections: राज्यसभेसाठी उद्या मतदान; 'या' राज्यात घोडेबाजाराची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.