ETV Bharat / state

कलम ३७० रद्द, केंद्र सरकारच्या निर्णयाबद्दल वाड्यात जल्लोष - palghar

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचे ऐतिहासिक पाऊल केंद्र सरकारने उचलले आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील वाडा शहरात भाजपच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयासमोर फटाके वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला.

कलम ३७० रद्द, केंद्र सरकारच्या निर्णयाबद्दल वाड्यात जल्लोष
author img

By

Published : Aug 6, 2019, 8:28 AM IST

पालघर (वाडा) - जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचे ऐतिहासिक पाऊल केंद्र सरकारने उचलले आहे. त्यामुळे वाडा शहरात भाजपच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयासमोर फटाके वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला. या जल्लोषानंतर वाडा बस स्थानकाजवळ मोटार रॅलीही काढण्यात आली. यावेळी 'भारत माता की जय' या घोषणा देऊन राष्ट्रध्वजही फिरवण्यात आला.

सरकार हे जम्मू-काश्मीरबद्दल महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची अपेक्षा गेल्या काही दिवसांपासून होती. त्यानुसार भाजपने आपल्या धोरणानुसार अखेर हा निर्णय घेतला. भारतीय संसदेने केलेले कायदे यामुळे आपोआप जम्मू-काश्मीरला लागू होणार आहेत.

कलम ३७० रद्द, केंद्र सरकारच्या निर्णयाबद्दल वाड्यात जल्लोष

लडाख परिसर केंद्रशासित प्रदेश करण्यात येणार असून येथे उपराज्यपाल कार्यरत होईल. त्यानंतर जम्मू-काश्मीर राज्याची विधानसभा अस्तित्वात राहील. मात्र, आता तिचा कार्यकाळ 5 वर्ष राहणार आहे. तसेच कलम ३७० व ३५-अ रद्द केल्यामुळे या राज्याचे स्वतंत्र संविधान रद्द होऊन 'भारताचे संविधान' लागू होईल.

यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबाजी काठोळे, तालुका अध्यक्ष संदीप पवार, सभापती अश्वविनी शेळके, रोहन पाटील, मनिष दहेरकर, राजू समेळ, अॅडव्होकेट संतोष डेंगाणे, कुणाल साळवी आदी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Intro:केंद्र सरकारच्या काश्मीरच्या निर्णयावर वाड्यात जल्लोष
पालघर (वाडा) संतोष पाटील
केंद्र सरकारने जम्मू काश्मीर बद्दल महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याने वाडा शहरात भाजपच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालय समोर फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला. या जल्लोषानंतर वाडा बस स्थानकाजवळ मोटार रॅली काढण्यात आली. यावेळी भारत माता की जय याव घोषणा देवून राष्ट्र ध्वज मिरविण्यात
आला.यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबाजी काठोळे, तालुका अध्यक्ष संदीप पवार, सभापती अश्वविनी शेळके, रोहन पाटील, मनिष दहेरकर, राजू समेळ,अॅडव्होकेट संतोष डेंगाणे ,कुणाल साळवी आदी मान्यवर पदाधिकारीी कार्यकर्ते उपस्थित होते.
सरकार हे जम्मू-काश्मीरबद्दल महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची अपेक्षा गेले काही दिवस होती. त्यानुसार भाजपने आपल्या धोऱणानुसार हा निर्णय अखेर घेतला. भारतीय संसदेने केलेले कायदे यामुळे आपोआप जम्मू काश्मिरला लागू होणार आहेत.
लदाख परिसर केंद्र शासित प्रदेश करण्यात येणार असून लदाख ला उप राज्यपाल कार्यरत होईल,जम्मू काश्मीर राज्याची विधानसभा अस्तित्वात राहील मात्र कार्यकाळ 5 वर्ष राहणार असून या राज्याला भारताचे संविधान लागू होईलBody:OkConclusion:Ok
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.