पालघर/वसई - राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वसईत कोरोना रुग्णांचा आकडा आता 67 वर गेला आहे. आज नव्याने वसई विरार महापालिकेच्या सर डी. एम. पेटीट रुग्णालयातील २ परिचारिका आणि एका वॉर्ड बॉयला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पेटीट रुग्णालयातील एकूण संख्या पाच झाली असून आजपर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 13 हजार 835 झाला आहे. यातील 11 हजार 616 जण अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 1 हजार 766 जण उपचारानंर बरे झाले असून 452 जण दगावल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालायने दिली आहे.