वसई-विरार (पालघर) - शहरात दिवसभरात १२ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे येथील रुग्णांची एकूण संख्या २७५ झाली आहे. तर, गुरुवारी २ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. यासह कोरोनामुक्त झालेल्या एकूण रुग्णांची संख्या १३३ झाली आहे. तर विरार पश्चिम येथील ५६ वर्षीय पुरुष रुग्णाचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. मृतांची एकूण संख्या १२ वर पोहोचली आहे. सध्या १३० अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.
रुग्ण क्र. २६४ विरार पश्चिमेकडील ५६ वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्ण मुंबई येथील देखभाल विभागातील कर्मचारी होता. १० मे २०२० रोजी त्यांची मुंबईतच कोव्हिड टेस्ट केली होती. प्रकृती खालावल्याने त्यांना १० मे रोजी नालासोपारा पश्चिमेकडील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. ११ मे रोजी रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. १३ मे रोजी त्यांचा कोव्हिड अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला.
यापुढील रुग्णांची माहिती अशी -
रुग्ण क्र.२६५ - विरार पूर्वेकडील ४३ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटीव्ह आहे. रुग्ण मुंबई येथील रुग्णालयातील कर्मचारी (स्टोअर कीपर) आहे.
रुग्ण क्र २६६- नालासोपारा पूर्वेकडील २५ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटीव्ह आहे. रुग्ण खासगी रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेचा वाहन चालक आहे.
रुग्ण क्र. २६७- नालासोपारा पूर्वेकडील ३५ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटीव्ह आहे. रुग्ण खासगी रुग्णवाहिकेचा वाहन चालक आहे.
रुग्ण क्र. २६८- नालासोपारा पूर्वेकडील ५५ वर्षीय महिला कोरोना पॉझिटीव्ह आहे. रुग्णास श्वसनाचा आजार पूर्वीपासून आहे.
रुग्ण क्र. २६९- विरार पूर्वेकडील ३० वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटीव्ह आहे. रुग्ण पोलीस कर्मचारी असून मुंबई येथे कर्तव्यास होते.
रुग्ण क्र. २७०- विरार पूर्वेकडील ३६ वर्षीय महिला कोरोना पॉझिटीव्ह आहे. रुग्ण महिला मुंबई येथील रुग्णालयातील परिचारिका (नर्स) आहे.
रुग्ण क्र. २७१- नालासोपारा पूर्वेकडील ६२ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटीव्ह आहे. रुग्ण मुंबई येथील दुकान चालक आहे.
रुग्ण क्र. २७२- विरार पश्चिम येथील ४३ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटीव्ह आहे. रुग्ण मुंबई येथील बँकेचा कर्मचारी आहे.
रुग्ण क्र. २७३- नालासोपारा पश्चिमेकडील ५४ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटीव्ह आहे. रुग्ण मुंबई येथील सेक्युरीटी गार्ड आहे.
रुग्ण क्र. २७४- नालासोपारा पश्चिमेकडील ६५ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटीव्ह आहे. रुग्ण कोविड पॉझिटीव्ह रुग्णाचा हायरिक्स संपर्कातील आहे.
रुग्ण क्र. २७५- नालासोपारा पश्चिमेकडील २८ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटीव्ह आहे. रुग्ण कोविड पॉझिटीव्ह रुग्णाचा हायरिक्स संपर्कातील आहे.