ETV Bharat / state

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी एकाच दिवसात दोन तरुणांनी संपवली जीवनयात्रा - Suicide of Praveen Kakasaheb Ghodke

Maratha Reservation : ‘एकच मिशन मराठा आरक्षण’ या अशी चिठ्ठी लिहून एका तरुणानं आत्महत्या केल्याची घटना निपाणी (ता. भूम) मध्ये घडली आहे. तसंच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आणखी एका तरुणानं आत्महत्या केलीय. 'आम्हाला आरक्षण मिळेपर्यंत माझ्यावर अंत्यसंस्कार करू नका' असं शाळेच्या फलकावर लिहून या तरुणाने आपली जीवनयात्रा संपवलीय.

Maratha Reservation
Maratha Reservation
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 26, 2023, 7:48 PM IST

धाराशिव (ईट ) Maratha Reservation : निपाणी (ता. भूम) येथील प्रवीण काकासाहेब घोडके (वय 36) या तरुण शेतकऱ्यानं बुधवारी (दि. 25) रोजी शेतात आत्महत्या केली. त्याचा मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन तपासणीसाठी आणलं असता, त्याच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. त्यात 'एकच मिशन मराठा आरक्षण' असा उल्लेख होता. या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. त्यांच्या पश्चात आजी, वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

माझ्यावर अंत्यसंस्कार करू नका : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आणखी एका तरुणानं आत्महत्या केलीय. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणानं शाळेच्या फलकावर सुसाईड नोट लिहून ठेवली. गणेश काकासाहेब कुबेर असं आत्महत्या केलेल्या या तरुणाचं नाव आहे. मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीनगरातील आपटगाव येथे एका तरुणानं आत्महत्या केलीय. गणेश काकासाहेब कुबेर असं या मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. 'आम्हाला आरक्षण मिळेपर्यंत माझ्यावर अंत्यसंस्कार करू नका' असं शाळेच्या फलकावर लिहून या तरुणानं आपली जीवनयात्रा संपवलीय.

ग्रामस्थ आक्रमक : गणेश कुबेर यांच्या आत्महत्येची घटना समजताच ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. त्यामुळं चिखलठाणा पोलीस, उपविभागीय पोलीस अधिकारी, नायब तहसीलदार, प्रशासनाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. मात्र, ग्रामस्थांनी यावेळी आक्रमक पवित्रा घेत आत्महत्या केलेल्या तरुणाच्या पत्नी किंवा मुलांना सरकारी नोकरी देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात लेखी आश्वासन मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

चार दिवसांत चार आत्महत्या : एकीकडे मनोज जरांगे पाटील मराठा तरुणांनी आत्महत्या करु नये, असं अवाहन करत असताना देखील, मराठा तरुण आरक्षणासाठी आपला जीव देत आहे. निपाणीत घोडके यांच्या आत्महत्येनं मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिक तापला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या चार दिवसांत चार मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम बुधवारी संपला. मात्र, सरकारनं अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळं मराठा समाजात असंतोष निर्माण झाल्याचं बोललं जात आहे.

हिंगोलीत तरुणाची आत्महत्या : कालच हिंगोली जिल्ह्यात एका तरुणानं आत्महत्या केली होती. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील देवजना येथील कृष्णा यशवंतराव कल्याणकर या तरुणानं जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली होती. देवजना परिसरातील त्यानं आत्महत्या केली होती. आखाडा बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला होता. पोलिसांना कृष्णाच्या खिशात ‘मराठा आरक्षणामुळं मी जीव देत आहे’ अशी चिठ्ठी सापडली होती. गेल्या काही दिवसांपासून कृष्णा फक्त मराठा आरक्षणाबाबत बोलत होता, असं त्याच्या जवळच्या मित्रांनी सांगितलं होतं.

सरकारला दिलेली मुदत संपली : मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 40 दिवसांची मुदत दिली होती. मात्र, मराठा आरक्षणावर सरकारला तोडगा काढता आला नाही. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं, या मागणीवर मनोज जरागे पाटील ठाम आहेत. याप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं आणखी वेळ मागितला आहे. त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण कधी मिळणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

हेही वाचा -

  1. Maratha Reservation Row : सदावर्तेंच्या गाड्यांच्या तोडफोडीवर जरांगे पाटलांची प्रतिक्रिया, काय म्हणाले पाहा व्हिडिओ
  2. Maratha Reservation Protest: मराठा आरक्षणाची धग; सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू...
  3. Maratha Kranti Morcha: आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यात राजकीय नेत्यांना बंदी; मराठा क्रांती मोर्चाची भूमिका...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.