उस्मानाबाद - तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेच्या मंदिरासमोर भेसळयुक्त कुंकू विक्रीचे प्रमाण वाढले आहे. या कुंकवाला आयएसआय मानांकन नाही. त्यामुळे या विक्रीवर व्यापार्यांनी बंदी घालण्याची शिफारस अन्न आणि औषध प्रशासन विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
हेही वाचा - उस्मानाबादमध्ये विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू , ग्रामस्थ संतप्त
तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची वर्षभर गर्दी असते. महिलांसाठी आणि देवीसाठी कुंकू म्हणजे सौभाग्याच लेणे समजले जाते. त्यामुळे मंदिरासमोर भेसळयुक्त कुंकू विक्रीचे प्रमाण अधिक आहे. नवरात्र उत्सवाच्या कालावधीमध्ये ढीग मांडून खुल्या पद्धतीने या ठिकाणी व्यापारी कुंकू विक्री करतात.
हेही वाचा - शरद पवारांवरील 'ईडी'च्या कारवाई निषेधार्थ कळंब शहरात कडकडीत बंद
त्यामुळे नियमानुसार पॅकेट बंद केलेले कुंकूची विक्री करावे, अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश अन्न आणि औषध प्रशासनाने दिले आहेत. गेल्या वर्षी नवरात्री उत्सवामध्ये प्रशासनाकडून कुंकवाचे व्यापाऱ्यांकडून नमुने घेण्यात आले होते. हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आल्यानंतर मिळालेल्या अहवालात फक्त 2 व्यापाऱ्यांच्या दुकानातील कुंकू वापरणे योग्य असल्याचे अहवालात म्हटले होते.
हेही वाचा - अबब! त्रिकोळी जिल्हा परिषद शाळेच्या भोजनात आढळून आली पाल