उस्मानाबाद - जवान, दुष्काळ आणि शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न असताना काँग्रेसच्या सभा मंडपाबाहेर मात्र नेत्यांच्या आगमनाप्रित्यर्थ फटाके फोडत आहेत. रविवारी काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा साडे सहा हजार किलोमीटर पूर्ण केल्यानंतर जिल्ह्यातील लोहार येथे पोहचली. यावेळी फटाके फोडण्यात आले.
महाराष्ट्राच्या हितासाठी जनतेच्या सुखासाठी असे ब्रीद वाक्य घेऊन काँग्रेसची जनसंघर्ष सभा सुरू आहे या सभेची सुरुवात तुळजापूर येथून करण्यात आली होती या सभेचे नेतृत्व काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्याकडे आहे सभेच्या सुरुवातीलाच जवानांवर ती झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत सभामंडपात शहीद झालेल्या जवानांना उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली आणि सभामंडपाच्या बाहेर प्रचंड प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
या सभेत सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय घेत शेतकरी आत्महत्या, दुष्काळ आणि जवानांवर झालेला भ्याड हल्ला विषय घेऊन काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण आमदार मधुकरराव चव्हाण आणि आमदार बसवराज पाटील यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले.
देशातील ४४ जवान शहीद झाले आहेत. संपूर्ण देश दुःखात आहे, मात्र काँग्रेसच्या या सभेत दोन वेगवेगळे दृश्य पाहायला मिळाली. पाकिस्तानने जो हल्ला केला त्याचा प्रतिकार केला पाहिजे, आपले जवान मारले गेलेत त्यामुळे पाकिस्तानवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी खासदार चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी व्यक्त केली. या जनसंघर्ष सभेला आमदार मधुकरराव चव्हाण, आमदार बसवराज पाटील उपस्थित होते.