ETV Bharat / state

Yeola Horse Market : येवल्यात नवरात्रोत्सवात ३५० वर्षांपासून भरतो घोड्यांचा सर्वात मोठा बाजार, खरेदीकरिता देशभरातून व्यापारी दाखल - व्यापारी येवल्यात घोडे खरेदी करण्यासाठी येतात

Yeola Horse Market : येवल्यात नवरात्रीत घोड्यांचा सगळ्यात मोठा बाजार भरतो. या बाजारात देशभरातून घोडे दाखल होतात. हा बाजार 350 वर्षापूर्वी राजे रघुजीबाबा यांनी सुरू केला होता.

Yeola Horse Market
बाजारात दाखल झालेले घोडे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 18, 2023, 1:38 PM IST

Updated : Oct 18, 2023, 2:32 PM IST

नाशिक Yeola Horse Market : नवरात्रीत सगळीकडं उत्साहाचं वातावरण असतं. या जल्लोषानं भारलेल्या वातावरणातच येवल्यात घोड्यांचा सगळ्यात मोठा बाजार भरतो. घोडे खरेदी करण्यासाठी देशभरातून व्यापारी येवल्यात घोडे खरेदी करण्यासाठी येतात. हा घोड्यांचा बाजार 350 वर्षांपूर्वी येवल्याचे संस्थापक राजे रघुजीबाबा यांनी सुरू केला आहे. येवला बाजार समितीच्या आवारात दसऱ्याच्या हा बाजार भरतो.

सतराव्या शतकापासून भरतो घोडे बाजार : येवला शहरात 350 वर्षाची परंपरा असलेला घोडेबाजार हा दसऱ्याच्या अगोदरच्या मंगळवारी भरत असतो. येवल्याचे संस्थापक राजे रघुजीबाबा यांनी हा सतराव्या शतकापासून हा घोडे बाजार येवला शहरात भरवण्यास सुरुवात केली होती. नवरात्र काळामध्ये दसऱ्याच्या अगोदर जो मंगळवार येतो, त्या मंगळवारी सर्वात मोठा घोड्यांचा बाजार येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरत असून या घोडेबाजारासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य घोडे शौकीन तसेच घोड्यांचे व्यापारी इथं घोडे खरेदी- विक्रीसाठी दाखल झाले आहेत. चेन्नई, कर्नाटक, पंजाब, काठेवाडी, गुजरात, पंजाब, माथेरान अशा अनेक राज्यातून येवला शहरात घोडे दाखल झाले आहेत. हा सर्वात मोठा नवरात्र उत्सवाच्या काळात भरणारा घोड्याचा बाजार आहे.

  • घोड्यांचे सजावट साहित्यदेखील दाखल : या येवला शहरात भरवण्यात येणाऱ्या घोडेबाजारामध्ये हजारो घोडे दाखल होत आहेत. या घोड्यांना सजवण्यासाठी लागणारं सजावट साहित्याची दुकानं थाटण्यात आली असल्यानं मोठ्या प्रमाणात अश्वप्रेमी हे साहित्य खरेदी करताना बाजार समितीत दिसून आलं.

दहा लाखापर्यंत घोड्यांच्या किमती : देशभरातून येवला शहरातील बाजार समिती आवरात घोडे विक्रीसाठी आले आहेत. यावेळी दहा हजारांपासून ते दहा लाख रुपयांपर्यंत या घोड्यांच्या किमती आहेत. आकर्षक उंच घोडे यावेळी या बाजारात दिसून आले. अनेक खरेदीदार तसेच घोडे व्यापारी देखील या बाजारात हातात रुमाल घेऊन आपला घोड्याचा सौदा करताना यावेळी दिसून येत होते. लाखो रुपयांचे घोडे या बाजारात बघण्यासाठी अश्वप्रेमींनी गर्दी केली होती.

राजे रघुजी बाबांनी सुरू केला बाजार : येवला शहराचे संस्थापक राजे रघुजी बाबा यांनी येवला शहराची स्थापना केली होती. त्या वेळपासूनच येवला शहरात हा बाजार भरवला जात होता. मात्र जागेअभावी नंतर हा घोडेबाजार येवला कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात भरवण्यास सुरुवात करण्यात आली. वर्षभर प्रत्येक मंगळवारी या ठिकाणी घोड्याचा बाजार भरवण्यात येतो. मात्र नवरात्रात येणाऱ्या मंगळवारी सर्वात मोठा बाजार या ठिकाणी भरवण्यात येत असल्याची माहिती रघुजीबाबाचे वंशज शाहूराजे शिंदे यांनी दिली.

हेही वाचा :

  1. Chetak Festival : चेतक फेस्टीव्हलमध्ये अश्व नृत्य स्पर्धांसाठी देशभरातील अश्व दाखल
  2. Horse Dance : घोड्याला नाचायला कसे शिकवतात, तुम्हाला माहिती आहे का?

Last Updated : Oct 18, 2023, 2:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.