नाशिक - गेल्या आठवडाभरापासून उत्तर महाराष्ट्रातील पारा पुन्हा एकदा घसरला आहे. साधारणपणे दररोज एक अंशाने तापमानात घसरण होत आहे. आज निफाडचे तापमान ७ अंश सेल्सिअस, धुळ्याचे १२ अंश तर नाशिकचे तापमान १० अंश सेल्सिअस आहे. रात्रीच्या वेळी थंड गार वाऱ्याचा तर दिवसा कडाक्याच्या उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
हेही वाचा - बळीराजाला दिलासा; ठाकरे सरकारकडून कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर
उत्तर महाराष्ट्रातील सरासरी कमाल तापमान ३० ते ३४ अंशावर आहे. एकूणच भर उन्हाळ्यात दोन ऋतुंचा मारा नागरिकांना सहन करावा लागत आहे. या मिश्र स्वरुपाच्या तापमानामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. ताप, सर्दी, वायरल इन्फेक्शनमुळे सध्या नागरिक त्रस्त आहेत.