ETV Bharat / state

ट्रक चालकांच्या संपांनं इंधन तुटवड्याची भीती, नंदुरबार शहरात पेट्रोल पंपावर वाहन चालकांच्या रांगा - Truck Drivers Strike

Petrol Shortage Maharashtra : केंद्र सरकारच्या नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांनी तीन दिवसीय संप पुकारलाय. सरकारनं या कायद्यात दुरुस्ती करावी, अशी ट्रक चालकांची मागणी आहे. अन्यथा सलग तीन दिवस संप सुरू असेल, असा इशारा ट्रक चालकांच्या संघटनांनी दिलाय. दरम्यान, याचा थेट परिणाम पेट्रोल पंपांवर पाहायला मिळत आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 2, 2024, 9:18 AM IST

नंदुरबारसह विविध शहरात नागरिकांनी पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली

नंदुरबार Petrol Shortage Maharashtra : केंद्र सरकारनं लागू केलेला नवीन मोटर वाहन कायदा मागे घ्यावा, या मागणीसाठी ट्रक चालक-मालक संघटनांनी चक्काजाम आंदोलन पुकारलंय. या आंदोलनात पेट्रोल, डिझेल, टँकर चालकांचाही समावेश आहे. त्यामुळं नंदुरबार शहरासह शहादा, नवापूर, तळोदा, अक्कलकुवा येथे पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी वाहनचालकांनी गर्दी केल्याचं दिसून आलं. तसंच सोमवारी (1 जाने.) रात्री उशिरापर्यंत वाहन चालक पेट्रोल पंपांवर चकरा मारत असल्याची चित्र बघायला मिळालं.

पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा : केंद्र शासनानं नवीन मोटर वाहन कायदा लागू केल्यानं या कायद्याविरोधात ट्रक मालक-चालक संघटना आणि पेट्रोल डिझेल वाहतूक चालक-मालक संघटनेनं चक्काजाम आंदोलन सुरू केलंय. त्याच्या परिणामी इंधन तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसंच या आंदोलनाबाबत कळताच पेट्रोल, डिझेल पंपावर वाहन चालकांनी मोठी गर्दी केली. नंदुरबार शहरासह शहादा, तळोदा, नवापूर, अक्कलकुवा या ठिकाणी पेट्रोल पंपांवर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.

  • आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांचे हाल : ट्रक मालक-चालक संघटना आणि पेट्रोल डिझेल वाहतूक चालक-मालक संघटनेनं चक्काजाम आंदोलन सुरू केल्याच्या काही तासांतच नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होताना दिसून येत आहेत. नियम त्वरित बदल करावा आणि ट्रक मालक चालकांचे आंदोलन त्वरित थांबवण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
  • गुजरात राज्यातील पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी : नंदुरबार जिल्हा हा महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमेवर असल्यानं वाहनचालकांनी गुजरात राज्यातील पेट्रोल पंपांवर देखील एकच गर्दी केली. रात्री उशिरापर्यंत गुजरात राज्यातील निजर, बेलदा येथील पेट्रोल पंपांवर नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केली.

हेही वाचा -

  1. नंदुरबारमध्ये वादळी पाऊस! वीज कोसळून तरुणीचा मृत्यू, तर कोट्यवधींची मिरची पाण्यात
  2. Nandurbar Crime News : नंदुरबार जिल्ह्यात 22 लाखांचा मद्यसाठा जप्त, दोन जणांना अटक
  3. Nandurbar Panchayat Samiti: पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यकाला लाच घेतांना रंगेहाथ पकडले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.