नाशिक: भारतीय सैन्य दलाच्या 74 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने नव्या कॉम्बॅक्ट गणवेशाचे अनावरण लष्कर प्रमुखांच्या हस्ते 15 जानेवारी रोजी सेना दिवसाच्या औचित्यावर करण्यात आले. या गणेशाचा वापर लष्करी तळावरील विविध सैन्य अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. सैन्य दलासाठी निश्चित करण्यात आलेल्या नव्या कॉम्बॅक्ट गणवेशाची अनधिकृत विक्री रोखण्यासाठी लष्कराने नव्या केमोफ्लॅज पॅर्टनच्या गणवेशाबाबतचे बौद्धिक संपदा अधिकारही प्राप्त केले आहे.
गणवेशाचे कॉपीराईट लष्कराकडे: गणवेशाच्या डिझाईन बाबतचे कॉपीराईट दहा वर्षासाठी भारतीय सैन्याने स्वतःकडे राखून ठेवले आहे. हे अधिकार आणखी पाच वर्षापर्यंत वाढविता येणार असल्याचे सूत्रांनी परिपत्रकात म्हटले आहे. खुल्या बाजारात सैन्याच्या या नवीन गणवेशाचे अनधिकृत उत्पादन व विक्री रोखण्यासाठी सैन्य दलाने हा नियम केली आहे. जेणेकरून सैन्य दलासह देशाची सुरक्षितता धोक्यात येणार नाही हा यामागील महत्त्वाचा उद्देश आहे.
लष्कराच्या युनिटच्या कॅन्टींग मध्ये विक्री: भारतीय संरक्षण खात्याच्या आदेशाने हे नवीन कॉम्बॅट गणवेश केवळ लष्कराच्या विविध युनिटच्या कॅन्टीन मधून विक्री केले जाणार आहे. तसे याबाबतचे सर्व विशेष अधिकार भारतीय सेनेकडे राखून ठेवण्यात आले आहेत. या गणवेशाचे अनधिकृतपणे पुनरुत्पादन आणि डिझाईन संबंधित उल्लंघन करणारे गैरकृत्य कोठे केले जात असल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई सैन्य दलाकडून केली जाणार आहे.
ऑलिव्ह ग्रीन रंगातील गणवेश: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या प्राध्यापकांसह आठ जणांच्या नमुने हा गणवेश तयार केला, या गणवेशाचा रंग ऑलिव्ह ग्रीन असून त्याचे कापड देखील सैनिकांसाठी जास्त आरामदायी राहणार आहे. नवा गणवेश चालू वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात संपूर्ण सैन्यात पूर्णपणे वापरला जात असल्याचे दिसून येईल.
नवीन गणवेशाची खासियत: नवीन गणवेश हा जुन्यापेक्षा अनेक प्रकारे वेगळा आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या टीमने लष्कराच्या नवीन गणवेशाची रचना केली आहे. यामध्ये काळ्या रंगाचा गोल नेक टी-शर्ट आत घालण्यात येईल. नवीन गणवेशाचा शर्ट जॅकेटसारखा असेल. यात वरच्या आणि खालच्या बाजूला खिसे असतील. बाजूला एक खिसा देखील असेल. पाठीवर चाकू ठेवण्याचीही जागा असेल. नवीन गणवेशाचे फॅब्रिक सध्याच्या गणवेशापेक्षा हलके आणि अधिक मजबूत आहे.