ETV Bharat / state

बाजारात येणाऱ्या प्रत्येकावर होणार सॅनिटायझरचा शिडकाव; जिल्ह्यातील पहिला प्रयोग

author img

By

Published : Apr 8, 2020, 10:44 AM IST

Updated : Apr 8, 2020, 2:44 PM IST

मनमाड शहरातील डेली भाजी मार्केटमध्ये जागा अरुंद असल्यामुळे येथे रोज मोठी गर्दी होत होती. कोरोनाचा प्रादुर्भाव हा गर्दीमुळे होत असल्याने मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेणकर यांनी भाजी मार्केट शहराच्या आययुडीपी भागात असलेल्या स्टेडियममध्ये स्थलांतर केले. तरीही भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी मोठी होत आहे. अखेर स्टेडियमचे सर्व गेट बंद करून येण्या-जाण्याकरता एकच गेट ठेवण्यात आला. या गेटवर कोरोना निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्यात आला आहे.

बाजारात येणाऱ्या प्रत्येकावर होणार सॅनिटायझरचा शिडकाव

नाशिक - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनमाड नगर परिषद प्रशासनातर्फे वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. या अंतर्गत स्टेडियमच्या आवारात भरणाऱ्या भाजीपाला मार्केटच्या मुख्य गेटसमोर कोरोना निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्यात आला आहे. मार्केटमध्ये भाजीपाला खरेदी करण्यासाठी येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला या कक्षामधूनच जावे लागते. त्यामुळे, त्यांच्यावर डेटॉलयुक्त औषधांची फवारणी होऊन त्यांचं सॅनिटाइझेशन होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या विषाणूची लागण होण्यापासून या नागरिकांचा बचाव होण्यास मदत मिळणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेणकर यांनी दिली.

मनमाड शहरातील डेली भाजी मार्केट हे शिवाजी चौक, भगतसिंग मैदान परिसरात भरत होते. मात्र, जागा अरुंद असल्यामुळे येथे रोज मोठी गर्दी होत होती. कोरोनाचा प्रादुर्भाव हा गर्दीमुळे होत असल्याने मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेणकर यांनी भाजी मार्केट शहराच्या आययुडीपी भागात असलेल्या स्टेडियममध्ये स्थलांतर केले. स्टेडियमचा परिसर मोठा असल्याने येथे सोशल डिस्टन्सिंग ठेवणे सोपे झाले. मात्र, तरी देखील भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी मोठी होत आहे. अखेर स्टेडियमचे सर्व गेट बंद करून येण्या-जाण्याकरता एकच गेट ठेवण्यात आला. या गेटवर कोरोना निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्यात आला आहे.

भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेल्या प्रत्येक नागरीकांसोबत शेतकरी, दुकानदार यांनादेखील या कक्षामधून जावे लागते. या कक्षामध्ये डेटॉलसह इतर निर्जंतुकीकरण करणाऱ्या औषधांचे फवारे लावण्यात आले आहेत. या कक्षात गेल्यानंतर अंगावर डेटॉलचा फवारा पडून संपूर्ण शरीर सॅनिटाईझ होत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे कोरोनाच्या विषाणूची लागण होण्यापासून बचाव होण्यास मदत होत आहे. तर, पालिकेतदेखील अशीच व्यवस्था करण्यात आल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यासह अशा सर्व ठिकाणी आम्ही असे प्रयोग करणार आहोत, जेथे जेथे गर्दीचे प्रमाण जास्त आहे. पालिका आणि पोलीस प्रशासन मिळून या सर्व उपयोजना करत आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ मंगळवारी उपविभागीय पोलीस अधीक्षक समिरसिंग साळवे व मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेणकर यांच्या हस्ते करण्यात आला.

Last Updated : Apr 8, 2020, 2:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.