ETV Bharat / state

कोरोनामुळे झालेल्या संचारबंदीने धास्तावले बेदाणा उत्पादक - corona go

कोरोनामुळे बाजार, मजूर उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहेत. बँकांकडून घेतलेले कर्ज आणि ज्या शेतकऱ्यांकडून माल घेतला त्यांना पैसे द्यायचे कोढून, या चिंतेने बेदाणा उत्पादक धास्तावला आहे.

बेदाणा शेड
बेदाणा शेड
author img

By

Published : Apr 5, 2020, 9:09 PM IST

नाशिक - दिंडोरी तालुक्यात द्राक्षशेतीचा जोड धंदा असणाऱ्या बेदाणे करण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे. पण, कोरोनामुळे बाजार, मजूर काहीच उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहेत.

व्यथा मांडताना बेदाणा उत्पादक शेतकरी

दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथे गेल्या अनेक वर्षांपासून बेदाणे करण्याचे काम शेतकरी दीपक गायकवाड व संतोष गायकवाड हे करतात. सध्या या शेतकऱ्यांना कोरोनामुळे निर्यात बंदीचा फटका बसत असल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

साधारणतः जानेवारी-फेब्रुवारी मध्येच शेतकरी लाखो रुपये खर्च करून बेदाण्यासाठी शेडची उभारणी करतात. त्यांनतर तालुक्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडे जाऊन हिरवे व काळे द्राक्ष विकत घेऊन त्यावर प्रक्रिया करून हा बेदाणे तयार करतात. बेदाणे तयार करण्यासाठी मजुरांनाही रोजगार उपलब्ध होतो. यासाठी बँक, सोसायटी यांच्याकडून कर्ज घेऊन शेतकरी हा माल खरेदी करतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दिंडोरी तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने बेदाण्याचे नुकसान झाले आहे. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्याने संचारबंदी, निर्यातबंदीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

बेदाणे तयार करूनही व्यापारीच नसल्याने हा माल विकायचा कसा व झालेल्या खर्चाचे करायचे काय? कोरोनाच्या भीतीने मजूरही कामावर येत नसल्याने व व्यापारीही फिरकत नसल्याने बेदाणा करणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे.

बँकांचे व सोसायटीचे कर्ज फेडायचे कसे आणि शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या मालाचे पैसे द्यायचे कोठून असा, प्रश्न बेदाणे करणाऱ्या शेतकऱ्यांना पडला आहे. तरी शासनाने यावर उपाययोजना करून लवकरात लवकर निर्यातबंदी उठवून शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक हाल थांबवावे अशी मागणी बेदाणे तयार करणारे शेतकरी करत आहे.

हेही वाचा - नाशिकमध्ये संचारबंदी उल्लंघनाचे १०१७ गुन्हे दाखल; अफवा पसरविणार्‍या २०० जणांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.