नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश महासत्तेकडे वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन प्रभारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. नाशिकला आयोजित विभागीय आयुक्त कार्यालयातील ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी विखे पाटील बोलत होते.
नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आज प्रभारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला, यावेळी महसूल व पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते,
आज सर्वत्र स्वतंत्र दिन साजरा होत असताना कोल्हापूर, सांगली भागात पूरस्थितीमूळे मोठी आपत्ती राज्यवर ओढवली आहे. यात प्रशासनाच्या वतीने राबवण्यात आलेल्या बचाव कार्यामुळे मोठी हानी टळल्याचे म्हणत या सर्व विभागने राधाकृष्ण विखे पाटील यांनी अभिनंदन केले.
देशात नरेंद्र मोदींच्या तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात अनेक योजना सुरू असून देश विकासाच्या दृष्टीने वाटचाल करत आहे. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत २२ लाख घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट आहे. याचा लाभ तळागाळातील जनतेला होणार आहे. शेतकऱ्यांसाठी दिलेल्या कर्जमाफीच्या निर्णयामुळे शेती व्यवस्थेला बळकट करण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असल्याचे विखे-पाटील यांनी म्हटले आहे. देशात विकासाच्या दृष्टीने अनेक प्रकल्प सुरू आहे. यामुळे जनतेने लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला जनाधार दिला असून येणाऱ्या काळात भारत महासत्ता होईल, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.