ETV Bharat / state

Accused in hospital : आरोपीच्या बंदोबस्तासाठी चार ते दहा पोलीस कर्मचारी तैनात; दिवसाला 80 हजार ते 1 लाखाचा खर्च - deployed for custody of accused

एका आरोपीच्या बंदोबस्तासाठी दिवसाला 80 हजार ते 1 लाखाचा खर्च ( 80 thousand per day for accommodation of accused ) येतो. गुन्हेगारांना काहीही झालेले नसताना केवळ कारागृहातून बाहेर राहण्यासाठी रुग्णालयाचा मार्ग अवलंबला जातो. ( Police personnel deployed for security )

Accused in hospital
आरोपीच्या बंदोबस्तासाठी चार ते दहा पोलीस कर्मचारी तैनात
author img

By

Published : Nov 17, 2022, 10:34 AM IST

नाशिक : सिव्हीलमध्ये दाखल एका आरोपीच्या बंदोबस्तासाठी दिवसाला 80 हजार ते 1 लाखाचा खर्च ( 80 thousand per day for accommodation of accused ) येतो. वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक केलेले आणि जेल मध्ये शिक्षा भोगत असलेल्या आरोपींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले ( Brought to district hospital for treatment ) जाते. अनेक वेळा या गुन्हेगारांना काहीही झालेले नसताना केवळ कारागृहातून बाहेर राहण्यासाठी रुग्णालयाचा मार्ग अवलंबला जातो. त्यामुळे एका गुन्हेगारामागे कधी चार तर कधी दहा पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात ( Police personnel deployed for security ) केले जातात आणि त्यांच्यावर एक दिवसाचा खर्च जवळपास 80 हजार ते 1 लाख रुपये होत असल्याचे दिसून आले आहे.

आरोपींवर विशेष करडी नजर : मध्यवर्ती कारागृहात विविध गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या आरोपींना उपचाराच्या नावाखाली जिल्हा रुग्णालयात आणले जाते. तेथे संबंधित फिजिशियन कडून तपासणी केल्यानंतर दाखल प्रक्रिया सुरू केली जाते. संबंधित फिजिशियनने तपासणी करत उच्च रक्तदाबाचे निदान केल्याने डॉक्टरांच्या निदानानंतर आरोपीला रुग्णालयात दाखल करून घेतले जाते. अशात खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपींवर विशेष करडी नजर ठेवण्यासाठी दिवसा पाच आणि रात्री पाच पोलिसांना तैनात केले जाते.

दहा पोलीस तैनात : काही दिवसापूर्वीच रमेश मंडलिक खून प्रकरणातील भु माफिया संशयित आरोपी रम्मी राजपूत याचा अंतिम जामीन फेटाळण्यात आला. मात्र उच्च रक्तदाबाच्या त्रासमुळे त्याला सिव्हिल मध्ये दाखल करण्यात आले. यावेळी रुग्णालय आणि पोलिसात निदानावरून मतभेदही झाले होते. मात्र आरोपीला रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आणि त्यावर करडी नजर ठेवण्यासाठी दिवस रात्र मिळून दहा पोलीस तैनात करण्यात आलेत.

असा होतो खर्च : उपचारासाठी दाखल झालेल्या संशयित आरोपी बंदोबस्तासाठी दिवसा पाच आणि रात्री पाच असे दहा कर्मचारी तैनात केले जातात,या कर्मचाऱ्यांमध्ये पोलीस हवालदार,पोलीस नाईक आणि पोलीस शिपाई दर्जाचे कर्मचारी यांची नियुक्ती केली जाते,दहा कर्मचारी नियुक्त असल्यास जवळपास एक लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे रुपये खर्च होतात.

बाहेर फिट अटक होताच अनफीट : अनेकदा संशयित जामिनावर बाहेर असताना फिट असतो. मात्र जामीन फेटल्यानंतर लगेचच रक्तदाबाचा त्रास झाल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येते. संबंधित फिजिशनने तपासणी करत उच्च रक्तदाबाची निदान केल्याने त्याला उपचारासाठी काही दिवस रुग्णालयात दाखल करण्यात येते. मात्र वारंवार होणाऱ्या आशा घटनांमुळे डॉक्टरांच्या निदनावर आता पोलिसांकडून संशय घेतला जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.