ETV Bharat / state

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 29 जानेवारीला ऑनलाइन दीक्षांत समारंभ

महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठांतर्गत विविध विद्याशाखांच्या पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासियता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या 8064 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

नाशिक
नाशिक
author img

By

Published : Jan 27, 2021, 6:36 PM IST

नाशिक - कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विसावा दीक्षांत समारंभ शुक्रवार, दि. 29 जानेवारी 2021 रोजी नाशिक येथे ऑनलाइन पध्दतीने करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले की, विद्यापीठाचा ऑनलाइन दीक्षांत समारंभात विद्यापीठाचे माननीय कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या समारंभास विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, आदी मान्यवर ऑनलाइन उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती देताना विद्यापीठाचे प्रति-कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर यांनी सांगितले की, विद्यापीठाचा विसावा दीक्षांत समारंभाचे विद्यापीठाच्या अधिसभागृहात सकाळी 11.00 वाजता आयोजन करण्यात आले असून या समारंभात ऑनलाइन पध्दतीने विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

8064 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठांतर्गत विविध विद्याशाखांच्या पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासियता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या 8064 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. विविध विद्याशाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्यांना 85 सुवर्णपदक विद्यार्थ्यांना सुवर्णपदक व संशोधन पूर्ण केलेल्या 03 विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रदान करण्यात येणार असल्याचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले

ऑनलाइन पद्धतीने पदवी प्रदान

दीक्षांत समारंभात आधुनिक वैद्यक विद्याशाखा पदवीचे 517, दंत विद्याशाखा पदवीचे 1926, आयुर्वेद विद्याशाखेचे 726, युनानी विद्याशाखेचे 80, होमिओपॅथी विद्याशाखेचे 943, पीबी बी.एस्सी. नर्सिंग विद्याशाखेचे 509, बी.पी.टी.एच. विद्याशाखेचे 134, बी.ओ.टी.एच. विद्याशाखेचे 13, बी.ए. एस.एल.पी. विद्याशाखेचे 34, बी.पी.ओ. विद्याशाखेचे 03, डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री विद्याशाखेचे 03, पदव्युत्तर विद्याशाखेमध्ये एम.डी.मेडिकल विद्याशाखेचे 1051, एम.एस.मेडिकल विद्याशाखेचे 673, डी.एम.मेडिकल विद्याशाखेचे 249, एम.सी.एच. मेडिकल विद्याशाखेचे 67, पी.जी.डिप्लोमा विद्याशाखेचे 262 आदी विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पदवी प्रदान करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाचे मा. परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले की,

दीक्षांत समारंभाचे https://t.jio/MUHS2021 वरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. विद्यापीठाचे संलग्नित महाविद्यालय, शिक्षक, विद्यार्थी, पालक व अभ्यागतांनी सदर दीक्षांत समारंभाचे प्रक्षेपण ऑनलाइन पहावे, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.