ETV Bharat / state

गोविंदा आला रे आला...राज्यभर दहीहंडीचा उत्सव, जाणून घ्या गोपाळकाल्याचे महत्त्व

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या गोपाळकाल्याचा उत्सव साजरा केला जातो. यानिमित्त आज राज्यभरात दहीहंडी फोडली जाते. गोविंदाची दहीहंडी फोडण्यासाठी स्पर्धा लागलेली आहे. त्यानिमित्त गोपाळकाल्याचे महत्त्व काय असते? हे जाणून घ्या...

गोविंदा आला रे आला...राज्यभर दहीहंडीचा उत्सव, जाणून घ्या गोपाळकाल्याचे महत्व
author img

By

Published : Aug 24, 2019, 7:57 AM IST

Updated : Aug 24, 2019, 12:04 PM IST

नाशिक - शहरात घरोघरी शुक्रवारपासून श्रीकृष्ण जन्माष्टमी धूम दिसून येत आहे. कृष्णावरील गाणे, भजन, गवळणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक गोविंदा मंडळांकडून आज शनिवारी गोपाळकाल्यानिमित्त ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्यात येणार आहे.

गोविंदा आला रे आला...राज्यभर दहीहंडीचा उत्सव, जाणून घ्या गोपाळकाल्याचे महत्व

नाशिक येथील नारायणी भजनी मंडळाच्यावतीने आयोजित एका कार्यक्रमात श्रीकृष्णाची लीला सांगणाऱ्या गवळणी सादर करण्यात आल्या. 'पैंजनाचा नाद आला गोड कानी गं, कृष्ण सावळा देव सावळा, रात्र काळी घागर काळी, राधे तुला, पाण्या निघाली गौळण, हरी तू आमुचा रे सवंगडी अशा अनेक गवळणी सादर करून श्रीकृष्णाच्या लीला सांगण्यात आल्या. यावेळी घराघरात श्रीकृष्णाची आरास साकारण्यात आली होती. तसेच जन्माष्टमीच्यानिमित्त श्रीकृष्ण मंदिरात भाविकांची गर्दी होती.

श्रीकृष्ण जन्माष्टमी -
श्रीकृष्ण जन्माष्टमीलाच गोकुळाष्टमी म्हणतात. यादिवशी कंसाच्या बंदीशाळेत वासुदेव आणि देवकीच्या पोटी कृष्णाचा जन्म झाला होता. त्यानंतर यशोदाने गोकुळात नेऊन त्याचा सांभाळ केला. त्यामुळे मथुरा, वृंदावन, द्वारका, तसेच मध्य भारतात आणि महाराष्ट्रात देखील हा जन्माष्टमी मोठ्या उत्साहाने साजरा करतात.

गोपाळकाला काय असतो?
गोपाल म्हणजे गायींचे पालन करणाऱ्या कृष्णाच्या जन्मोत्सवानिमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो. त्यामुळे त्याला गोपालकाला म्हणतात. त्यामध्ये पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबू व आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांचे तुकडे आदी पदार्थ टाकून दहीकाला तयार केला जातो. हा दहीकाला कृष्णाला अधिक प्रिय होता, असे मानले जाते. महाराष्ट्रात या दहीकाल्याचे सेवन करून दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो.

गोविंदा आला रे आला...
महाराष्ट्रात विशेषत: मुंबईत दही-दुधाने भरलेला मडके उंचावर लटकवले जाते. त्यानंतर मानवी मनोरा तयार केला जातो आणि ती दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदांची स्पर्धा सुरू होते. यावेळी गोविंदा आला रे आला...असे गाणं म्हणत सर्वजण दहीहंडी उत्सव साजरा करीत असतात.

Intro:गवळणींतून श्रीकृष्णच्या लीलांचं सादरीकरण..जन्माष्टमीचा घरोघरी उत्साह...

Body:नाशिक मध्ये घरोघरी श्री कृष्ण जन्माष्टमी धूम दिसून येत आहे,श्री कृष्ण जन्माच्या आधी पासुनच मंदिरांन प्रमाणेच घराघरात श्री कृष्णावरील गाणे,भजन,गवळनीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले..

नाशिक येथील नारायणी भजनी मंडळाच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात श्री कृष्णाची लीला सांगणाऱ्या गवळणी सादर करण्यात आल्या,पैंजनाचा नाद आला गोड कानी गं,कृष्ण सावळा देव सावळा,रात्र काळी घागर काळी,राधे तुला,पाण्या निघाली गौळण,हरी तू आमुचा रे सवंगडी अशा अनेक गवळणी सादर करून श्री कृष्णाच्या लीला ह्यातून सांगण्यात आल्या..ह्यावेळी घराघरात श्री कृष्णाची आरास साकारण्यात आल्या होत्या..तसेच जन्माष्टमीच्या निमित्त श्री कृष्ण मंदिर भाविकांनी फुलून गेली होती...

Conclusion:
Last Updated : Aug 24, 2019, 12:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.