ETV Bharat / state

Trimbakeshwar Temple news : भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! श्रावणात त्र्यंबकेश्वर मंदिर पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार - Trimbakeshwar Temple

हिंदु धर्मात श्रावण महिना व सोमवारला महत्वाचे स्थान आहे. श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे भाविकांना दर्शनासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर हे पहाटे 5 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहणार आहे.

Trimbakeshwar Temple Nashik
त्र्यंबकेश्वर मंदिर
author img

By

Published : Aug 17, 2023, 7:12 PM IST

नाशिक : श्रावण महिना म्हटले की, सण-उत्सव, सांस्कृतिक-धार्मिक कार्यक्रम असे उत्साही वातावरण डोळ्यासमोर येते. अत्यंत महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला आजपासून प्रारंभ झाला आहे. श्रावणासाठी ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर मंदिरासह नाशिक शहरातील प्रमुख शिव मंदिरात दर्शनासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर पहाटे पाच ते नऊ वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे.

त्र्यंबकेश्वर विश्वस्त समितीचे खास नियोजन : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. अशात अत्यंत पवित्र आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला आजपासून प्रारंभ झाला आहे. भाविकांची हजारोच्या संख्येने होणारी गर्दी लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वर विश्वस्त समिती व पोलिसांच्या वतीने खास नियोजन करण्यात आले आहे. भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावे, चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत.

वातानुकूलित दर्शनरांग : ज्योतिर्लिंग श्री त्रंबकेश्वरच्या दर्शनासाठी भाविकांना वातानुकूलित दर्शनबारीची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी हजारो भाविक दर्शनासाठी उभे राहू शकतील, ज्येष्ठांना या दर्शन रांगेत बसण्याची व्यवस्था असून पिण्याचे पाणी तसेच प्राथमिक आरोग्य कक्ष तयार करण्यात आले आहेत. स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष उपलब्ध केले आहेत. यामुळे भाविकांचे दर्शन सुलभ होऊ शकणार आहे. श्रावणात दररोज पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी उघडे राहील, तर प्रत्येक श्रावणी सोमवारी पहाटे 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत दर्शन सुरू राहणार आहे.

त्र्यंबकेश्वर गावकऱ्यांना विशेष वेळ : त्र्यंबकेश्वरच्या गावकऱ्यांना उत्तर महाद्वारातून प्रवेश दिला जाईल. सकाळी मंदिर उघडल्यापासून सकाळी 10.30 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत गावकऱ्यांना दर्शन घेता येईल. त्यासाठी स्थानिक रहिवासी असल्याचा पुरावा मात्र सोबत ठेवावा लागणार आहे. दर्शन देणगी, दर्शन रांग उत्तर दरवाजातून सुरू होईल असे मंदिराच्या विश्वस्तांनी सांगितले आहे.

लाडू, बिस्कीट, पाण्याचे मोफत वाटप : दरवर्षी श्रावण मासाच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची मोठी गर्दी होते. यात श्रावणी सोमवार निमित्त हजारो भाविक दर्शनाचा लाभ घेतात. यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान प्रशासनाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे दर्शन रांगेत उभ्या असणाऱ्या भाविकांना दर्शनानंतर राजगीऱ्याचे लाडू तसेच रांगेत बिस्कीटचे पुडे व पाण्याची बाटली मोफत दिली जाणार असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिर महत्व : त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील एक प्राचीन तीर्थस्थान आहे. सर्व 12 ज्योतिर्लिंगापैकी हे विशेष आहे. हे मंदिर नाशिक शहरापासून 28 किमी अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात स्थित आहे. पवित्र “गंगा गोदावरी” नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वराच्या जवळ आहे. मंदिर प्रांगणाच्या जवळच कुशावर्त तीर्थ आहे. श्री ज्ञानेश्वर माऊलींचे मोठे बंधू श्री निवृत्तीनाथ महाराजांची समाधी देखील त्र्यंबकेश्वर मध्येच आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये अनेक धार्मिक संस्था देखील आहेत. ज्या वेदशाळा, संस्कृत पाठशाळा, कीर्तन पाठशाळा, प्रवचन संस्था चालवितात.

अशी आहे ओळख : पौराणिक कथेनुसार असे सांगितले जाते की, ब्रह्मदेवांनी येथे एका पर्वतावर श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तप केले. जे पुढील काळात “ब्रह्मगिरी पर्वत” नावाने विख्यात झाले. या पर्वतावर एकेकाळी गौतम ऋषींचे आश्रम होते. केलेल्या अपराधातून मुक्तता मिळावी म्हणून त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि महादेवांना प्रसन्न केले. गौतम ऋषींच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन महादेवांनी त्रिमूर्ती ज्योतिर्लिंग स्वरूप धारण केले आणि तिथेच विराजमान झाले, अशी आख्यायिका आहे. तेव्हापासून हे स्थान त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले. त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची वास्तविक रचना इतर 11 ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळी आहे. त्र्यंबकेश्वर येथे शिवपिंडीमध्ये अंगठ्याच्या आकाराच्या तीन कपार आहेत. ज्यात त्रिमूर्ती म्हणजेच “ब्रह्मा-विष्णु-महेश” विद्यमान आहेत. या ज्योतिर्लिंगाची “त्रिकाल पूजा” केली जाते, जी स्थानिक माहितीप्रमाणे 350 वर्षांपासून सुरू आहे.

हेही वाचा -

  1. Trimbakeshwar Temple Nashik : त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेला प्रकार गंभीर ; देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
  2. Raj Thackeray On Trimbakeshwar : 'कोणी मंदिरात आल्याने आपला धर्म बुडेल एवढा तो कमकुवत आहे का?'
  3. Sri Kshetra Trimbakeshwar : श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची अलोट गर्दी; चला तर मग आपणही घेऊया दर्शन...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.