ETV Bharat / state

नाशिक ते बेळगाव विमानसेवा २५ जानेवारीपासून सुरू

अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असणारी नाशिक आणि उत्तर कर्नाटक यांना थेट जोडणारी विमानसेवा लवकरच सुरू होत आहे. बेंगळुरू स्थित स्टार एअर ही भारतातील अग्रगण्य प्रादेशिक विमान कंपनी आपल्या दुसर्‍या वर्धापनदिनानिमित्त उडान योजनेतंर्गत २५ जानेवारी २०२१ पासून ओझरच्या नाशिक विमानतळावरून नाशिक ते बेळगाव दरम्यान थेट उड्डाण सेवा सुरू करणार आहे.

नाशिक ते बेळगाव विमानसेवा २५ जानेवारीपासून सुरू
नाशिक ते बेळगाव विमानसेवा २५ जानेवारीपासून सुरू
author img

By

Published : Jan 20, 2021, 3:06 PM IST

नाशिक- अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असणारी नाशिक आणि उत्तर कर्नाटक यांना थेट जोडणारी विमानसेवा लवकरच सुरू होत आहे. बेंगळुरू स्थित स्टार एअर ही भारतातील अग्रगण्य प्रादेशिक विमान कंपनी आपल्या दुसर्‍या वर्धापनदिनानिमित्त उडान योजनेतंर्गत २५ जानेवारी २०२१ पासून ओझरच्या नाशिक विमानतळावरून नाशिक ते बेळगाव दरम्यान थेट उड्डाण सेवा सुरू करणार आहे.

नाशिक ते बेळगाव दरम्यानच्या थेट विमानसेवेमुळे 'प्रादेशिक एअरोस्पेस' क्षेत्राला चालना मिळणार आहे, कारण बेळगाव हे भारतातील पहिले खासगी 'एअरोस्पेस एसईझेड' आहे. भारताचे संरक्षण आणि एअरोस्पेस उत्पादनाचे केंद्रस्थान असलेले बेळगाव हे नाशिकसह जगभरातील एअरोस्पेस क्षेत्राच्या महत्तवपूर्ण अभियांत्रिकी गरजांची पूर्तता करते. नाशिक आणि बेळगाव हे अंतर साधारणपणे 580 किलोमिटरचे असून, नाशिकहून बेळगावला जाण्यासाठी 11 ते 12 तासांचा वेळ लागतो. मात्र आता विमानसेवेमुळे हे अंतर फक्त 1 तासांमध्ये पूर्ण होणार आहे. नाशिककरांसाठी या विमान सेवेमुळे आता उत्तर कर्नाटक (बेळगाव, हुबळी, धारवाड, विजापूर), दक्षिण महाराष्ट्र (कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी) तसेच गोवा या ठिकाणी प्रवास करणे अत्यंत सोयीचे होणार आहे.

प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत

आपल्या या नव्या सेवेबद्दल बोलताना स्टार एअरचे संचालक श्रेणिक घोडावत म्हणाले की, "स्टार एअर दोन प्रमुख भारतीय शहरांना जोडणार असल्याची घोषणा करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. यामुळे प्रादेशिक कनेक्टिव्हिटी नक्कीच वाढेल आणि दोन्ही राज्यांतील व्यापार आणि पर्यटनालाही चालना मिळेल." या विमानसेवेमुळे नाशिक आणि आसपासच्या परिसरातील पर्यटकांना बेळगावपासून सुमारे दीड तासांच्या अंतरावर असलेल्या कोल्हापूर व गोव्याला भेट देता येणार आहे. याचबरोबर स्टार एअरच्या उड्डाण सेवेमुळे बेळगाव आणि आसपासच्या जिल्ह्यांतून लाखो भाविकांना महाराष्ट्राच्या आध्यात्मिक राजधानी असलेल्या नाशिक तसेच शिर्डीला येणे आता सुलभ होणार आहे.

प्रवाशांकडून मिळणारा प्रतिसाद प्रोत्साहन देतो

संजय घोडावत ग्रुपचे अध्यक्ष संजय घोडावत म्हणाले की, 'आरसीएस-उडान अंतर्गत भारतातील दुसर्‍या व तिसर्‍या श्रेणीच्या शहरांना जोडणार असल्याचा आम्हाला आनंद होत आहे. प्रवाशांकडून मिळणारा प्रचंड प्रतिसाद आम्हाला नेहमीच प्रोत्साहन देत असतो. अब्जावधी डॉलर्सच्या दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्पासाठी नाशिक अत्यंत महत्त्वाचे असल्याने नाशिकहून उड्डाण सेवा सुरू करण्यासाठी आम्ही खरोखरच उत्सुक आहोत, ज्यामुळे औद्योगिक उपक्रमांना नक्कीच मदत होईल. स्टार एअर ही भारतातील एकमेव एअरलाइन आहे जी अद्ययावत एम्ब्रर ERJ145 या विमानांचा वापर करते. एम्ब्रर कंपनीची विमाने ही आरामदायी, वेगवान आणि सुरक्षित म्हणून जगभरात प्रचलित आहेत. नाशिक ते बेळगाव दरम्यान आठवड्यातून तीन वेळा म्हणजेच सोमवार, शुक्रवार आणि रविवारी ही विमानसेवा उपलब्ध असणार आहे. उद्घाटनानिमित्त व आरसीएस-उडान योजनेअंतर्गत ही विमानसेवा मर्यादित कालावधीसाठी फक्त 1999 रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्टार एअर सध्या अहमदाबाद, अजमेर (किशनगड), बेळगावी, बेंगळुरू, दिल्ली (हिंडन), हुबळी, तिरुपती, इंदूर, कलबुर्गी, मुंबई आणि सुरतसह 10 हून अधिक भारतीय शहरांना सेवा पुरवते. याशिवाय लवकरच जोधपूर व जामनगरला जाणारी सेवाही सुरू होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.