नाशिक - मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर नाशिकच्या सातपूर भागात तरुण शेतकऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंद उत्सव साजरा केला. मुख्यमंत्र्यांची कार्यपद्धती खोटं बोल पण रेटून बोल, अशी होती. यामुळे शेतकर्यांना समजून घेणारी व्यक्ती मुख्यमंत्री पदावर पदावर बसायला हवी अशी भावना शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.
हेही वाचा - शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विचार केला नाही - काँग्रेस
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर सातपूर कॉलनी लगतच्या श्रीराम चौकात तरुण शेतकरी एकत्र जमले होते. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यप्रणालीचा निषेध करत राजीनामा दिल्याबद्दल आनंदोत्सव साजरा केला आहे. फडणवीस सरकारने केलेली कर्जमाफी खोटी ठरली असून, अनेक किचकट अटी शर्ती टाकून शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ केल्यामुळे अनेकांना कर्जमाफीचा फायदा झाला नाही. अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी यावेळी केली. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले. त्यामुळे फडणवीस यांच्या राजीनाम्या नंतर आम्ही फटाके फोडून आनंद उत्सव साजरा करत असल्याचे यावेळी ते म्हणाले.
हेही वाचा - अयोध्या प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा सर्वांनी सन्मान करावा- फडणवीस