ETV Bharat / state

नाशिक शहरात शनिवारी वाढले 334 नवे कोरोनाबाधित रुग्ण

author img

By

Published : Aug 16, 2020, 12:03 PM IST

नाशिक शहरात ३३४ रुग्णांची नव्याने नोंद झाली आहे. त्यामुळे शहराची एकूण रुग्ण संख्या १६ हजार १०४ झालीये, तर जिल्ह्यातील रुग्णांचा एकूण आकडा हा तब्बल २३ हजार ७०५ वर गेला आहे.

नाशिक शहरात शनिवारी वाढले 334 नवे कोरोनाबाधित रुग्ण
नाशिक शहरात शनिवारी वाढले 334 नवे कोरोनाबाधित रुग्ण

नाशिक - शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढतच आहे. रविवारी दिवसभरात नाशिक शहरात ३३४ रुग्णांची नव्याने नोंद झाली आहे. त्यामुळे शहराची एकूण रुग्ण संख्या १६ हजार १०४ झालीये, तर जिल्ह्यातील रुग्णांचा एकूण आकडा हा तब्बल २३ हजार ७०५ वर गेला आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाची चिंताही आता वाढू लागली आहे.

आतापर्यंत कोरोनाने जिल्ह्यात ६७६ जणांचा बळी घेतला आहे. शहरातील कोरोनाची स्थिती बघता नागरिकांनी बाहेर फिरताना काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ७३.४८, टक्के, नाशिक शहरात ७६.२१ टक्के, मालेगाव मध्ये ७१.२४ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८३.४२ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७५.२२ इतके आहे.

२३ हजार ७०५ कोरोनाबाधित रुग्णांपैकी १७ हजार ५८० रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ५ हजार ४३९ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५.२२ टक्के आहे.

कोरोनाचे बळी-

नाशिक ग्रामीण १७४, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ३८६, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून ९५ व जिल्हा बाहेरील २१ अशा एकूण ६७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.