नाशिक: एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये आलेली पक्षातील मरगळ दूर करून, आगामी निवडणुकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन नाशिक दौऱ्यावर आहेत.आज सायंकाळी उशिरा हॉटेल एक्सप्रेस मध्ये राज ठाकरे यांचे आगमन झाले. तर राज ठाकरे यांच्या दौऱ्याने पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य पसरले आहे. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी होर्डिंग लागले आहेत. पदाधिकाऱ्यांनी शक्तिप्रदर्शन करत राज ठाकरे यांचे नाशिकमध्ये स्वागत केले.
पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार: दोन दिवसीय नाशिक दौऱ्यात राज ठाकरे उद्या सकाळपासूनच शाखाध्यक्ष, शहर पदाधिकारी, विधानसभा अध्यक्ष, महिला आघाडीसह ग्रामीण भागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी बैठकीतून संवाद साधून मार्गदर्शन करणार आहे. तर रविवारी जिल्ह्यातील शेतकरी संघटना, क्रेडाई सारख्या बांधकाम संघटनांशी राज ठाकरे हे चर्चा करणार आहेत. तसेच निमाच्या पावर एक्सपो प्रदर्शनाला देखील राज ठाकरे भेट देणार आहे.
नाशिक दौऱ्यात राज ठाकरे उद्या सकाळपासूनच शाखाध्यक्ष, शहर पदाधिकारी, विधानसभा अध्यक्ष, महिला आघाडीसह ग्रामीण भागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी बैठकीतून संवाद साधून मार्गदर्शन करणार - मनसे पदाधिकारी संदीप देशपांडे
राज ठाकरे काय मार्गदर्शन करणार: 2012 ते 2017 या पाच वर्षात मनसेची नाशिक महानगर पालिकेत एक हाती सत्ता असलेल्या, मनसेला 3 आमदारही नाशिककरांनी दिले. मात्र 2015 पासू मनसेला आलेली ओहोटी अजूनही दूर करण्यात राज ठाकरे यांना यश आलेले नाही. त्यामुळे राज ठाकरे यांच्या दोन दिवसीय नाशिक दौऱ्यात आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे काय मार्गदर्शन करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर दिलीप दातीर यांनी राजीनामा दिल्याने शहराध्यक्ष पदाबाबत देखील राज ठाकरे यांना निर्णय घ्यावा लागणार आहे.
पावसाळ्यानंतर निवडणुका होतील: एक वर्षापासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही पावसाळ्यानंतर होण्याची शक्यता आहे. मुंबई, नाशिक, पुणे या महत्त्वाच्या महापालिकांसह राज्यातील 18 महापालिकांच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याचा अंदाज आहे.
हेही वाचा -