ETV Bharat / state

कृत्रिम पावसाचा प्रयोग अशास्त्रीय, सरकारने पैसा वाया घालवू नये; हवामानतज्ज्ञांचा सल्ला - नाशिक

ऑस्ट्रेलियामध्ये कृत्रिम पावसाच्या प्रयोगावर बंदी घालण्यात आली आहे. पावसाचा प्रयोग मान्सून पूर्व आणि मान्सून उत्तर काळात करणे धोकादायक आहे. इस्रोने कृत्रिम पावसाच्या प्रयोगात पुढाकार घेतल्या हे प्रयोग यशस्वी होऊ शकतील, असे जोहरे म्हणाले.

प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : May 30, 2019, 11:51 AM IST

नाशिक - कृत्रिम पावसाच्या प्रयोगामुळे तेवढ्याच भागात पाऊस पडत असतो. त्यामुळे त्यासमोरील भागात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होऊ शकते. तसेच अशास्त्रीय पद्धतीने हा प्रयोग करण्यात येतो. त्यामुळे शासनाने हा प्रयोग करून पैसे वाया घालवू नये, असे मत हवामानतज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी व्यक्त केले.

कृत्रिम पावसाबद्दल माहिती देताना हवामानतज्ज्ञ किरणकुमार जोहरे

ढगांवर फवारणी करण्यात येणारे रसायन प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात फवारल्यास ढग नष्ट होतात. त्यामुळे नैसर्गिकरित्या पडणारा पाऊसदेखील पडत नाही. कृत्रिम पावसाच्या प्रयोगात वापरले जाणारे 'सिल्वर आयोडाइड' हे विषारी रसायन आहे. हे रसायन पर्यावरण आणि सस्तन प्राण्यांसाठी घातक आहे. पावसाबरोबर जमिनीतील मातीत घातक रसायन मिसळल्यामुळे पिकांचे नुकसान होत असते. सिल्वर आयोडाइड मुळे पर्यावरणालादेखील हानी पोहोचत असल्याचे जोहरे म्हणाले.

ऑस्ट्रेलियामध्ये कृत्रिम पावसाच्या प्रयोगावर बंदी घालण्यात आली आहे. पावसाचा प्रयोग मान्सून पूर्व आणि मान्सून उत्तर काळात करणे धोकादायक आहे. इस्रोने कृत्रिम पावसाच्या प्रयोगात पुढाकार घेतल्या हे प्रयोग यशस्वी होऊ शकतील, असे जोहरे म्हणाले.

राज्यात आतापर्यंत कृत्रिम पावसाचा प्रयोग अयशस्वी -
शासनाने २०१५ मध्ये औरंगाबाद, तर २०१७ ला सोलापूरमध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग केला होता. यंदा मराठवाड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल ३० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यामुळे अशास्त्रशुद्ध पद्धतीने केले जाणारे कृत्रिम पावसाचे प्रयोग सरकारने थांबवावे. तसेच पैसे वाया घालवू नये, असा सल्ला किरणकुमार जोहरे यांनी दिला आहे.

Intro:कृत्रिम पावसाचे प्रयोग करून सरकारने पैसे वाया घालू नये-हवामानतज्ञ किरणकुमार जोहरे

Body:सरकार कृत्रिम पावसाचे प्रयोग अशास्त्रशुद्ध पद्धतीने करत असून उगाच पैसे वाया घालू नये असं मतं हवामानतज्ञ किरणकुमार जोहरे यांनी व्यक्त केलं,इटीव्ही भारत ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलले..

कृत्रिम पावसाच्या प्रयोगामुळे ढगांची चोरी अथवा कृत्रिम ढग खर्ची पडल्याने,पुढील भागात ढग पुढे जात नाही,त्यामुळे पुढच्या परिसरात पाऊस न झाल्यास त्या ठिकाणी आगामी काळात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होऊ शकते, ढगांवर फवारणी करण्यात येणारे रसायन प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात फवारले गेले तर ढग नष्ट होतात, नैसर्गिक होणारा पाऊस देखील नंतर होत नाही, कृत्रिम पावसाच्या प्रयोगात वापरले जाणारे सिल्वर आयोडाइड हे रसायन विषारी असल्याने पर्यावरण आणि सस्तन प्राण्यासाठी घातक आहे,जमिनीतील मातीत मिसळल्यामुळे पिकांसाठी घातक ठरते, सिल्वर आयोडाइड मुळे पर्यावरणाला हानी पोहोचते,ऑस्ट्रेलियामध्ये कृत्रिम पावसाच्या प्रयोगावर बंदी घालण्यात आली आहे,पावसाचा प्रयोग मान्सून पूर्व आणि मान्सून उत्तर काळात करणे धोकादायक असल्याचे हवामानतज्ञ किरणकुमार जोहरे यांनी म्हटलं आहे..जर इस्रोने कृत्रिम पावसाच्या प्रयोगात पुढाकार घेतला तर हे प्रयोग यशस्वी होऊ शकतील असं जोहरे ह्यांनी म्हटलं आहे...

राज्यात अद्याप एकदाही कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झालेला नाही,
शासनाने यापूर्वी 2015 मध्ये औरंगाबाद तर 2017 मध्ये सोलापूर मध्ये असा प्रयोग केला होता,यंदा मराठवाड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार असून त्यासाठी तब्बल तीस कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे, त्यामुळे अशास्त्रशुद्ध पद्धतीने केले जाणारे कृत्रिम पावसाचे प्रयोग सरकारने थांबून पैसे वाया घालू नये असा सल्ला किरण कुमार जोहरे यांनी दिला आहे..

बाईट किरणकुमार जोहरे हवामानतज्ञ..

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.