सिल्लोड - सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला. यामुळे राज्यातील मराठा समाजात प्रचंड नाराजी पसरली आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीमुळे नाराजी व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर न उतरता झूम मिटिंगद्वारे न्यायालयाच्या निर्णयावर चर्चा करण्यात आली , व आजच्या या निर्णयचा समाजाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
निर्णयाचा पुनर्विचार करावा
या वेळी मराठा संघटनांनी आगामी लढाई कश्या पद्धतीने लढायची , समाजातील सामान्य होतकरू तरुणाला न्याय कसा मिळवून देता येईल, यावर सखोल चर्चा केली. वरिष्ठ पातळीवरील समन्वयकांशी संपर्क करून पुढील दिशा व आराखडा ठरवण्यात आला, होतकरू मराठा तरुणाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी आवर्जून पुढे यावे सहकार्य करावे आणि पुन्हा एकदा या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे आवाहन करण्यात आले.
आरक्षणासाठी या अगोदर मराठा समाजाने आपल्या मागण्या, भावना व्यक्त करण्यासाठी ऐतिहासिक मोर्चे काढले. त्या मोर्च्यांची नियोजनाची जगभर चर्चा आणि कौतुक झाले, नेहमी मराठा समाजाने प्रशासनाला सहकार्य केले आहे. तश्याच प्रकारे यावेळी समाजाने भावना व्यक्त करतांना कोरोना महामारीमध्ये रस्त्यावर न उतरता सर्व नियमांचं पालन करत न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला.
यापुढेही न थांबता लढत राहणार
यावेळी प्रा.एन बी चापे सर , डॉ निलेश मिरकर , डॉ शेखर दौड, शिवाजी दाभाडे, पंकज गोराडे, आशिष गोराडे, संतोष गाडेकर,राजेश देवरे, सुनील मिरकर,संतोष शिंदे,अक्षय मगर, नरेंद्र बापू पाटील, दत्तात्रय बावस्कर,विशाल महाजन, संजय महाजन,रमेश चव्हाण,सुखदेव भगत,विशाल जाधव,संतोष लक्कस, उदय तायडे, राजेंद्र कावले, किरण पवार, विजय वानखेडे, विजय सोनवणे, मयूर क्षीरसागर, सोमनाथ कळम, डॉ संतोष शिंदे , डॉ विशाल आकाते,किशोर काकडे, सिद्धेश्वर आहेर, डॉ दिनेश साळवे,अमोल शेजुळ इत्यादी बांधव ऑनलाइन मिटिंग साठी सहभागी झाले होते , चर्चेअंती मराठा समाज आरक्षणासाठी न्यायासाठी यापुढेही न थांबता लढत राहणार असे ठरले आहे.