ETV Bharat / state

औरंगाबाद मधील फरार आरोपीला मनमाड लोहमार्ग पोलिसांकडुन अटक - औरंगाबाद मधील फरार आरोपीला अटक

औरंगाबाद येथील मुकुंदवाडी पोलिस स्थानकात 394 खाली गुन्हा दाखल असलेला आरोपी फरार झाला होता. या आरोपीला मनमाड लोहमार्ग पोलिसांकडुन अटक करण्यात आली.

manmad-lohmarg-police-arrest-absconding-accused-in-aurangabad
औरंगाबाद मधील फरार आरोपीला मनमाड लोहमार्ग पोलिसांकडुन अटक
author img

By

Published : Feb 13, 2021, 8:46 PM IST

मनमाड (नाशिक) - औरंगाबाद येथील मुकुंदवाडी पोलिस स्थानकात 394 कलमा खाली गुन्हा दाखल असलेल्या फरार आरोपीला मनमाड येथे सापळा रचून लोहमार्ग पोलिसांनी अटक केले. या आरोपीला औरंगाबाद पोलीसांच्या हवाली करण्यात आले आहे.

औरंगाबाद येथील मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात 394 कलमाणव्ये गुन्हा दाखल असलेला आरोपी अमर गायकवाड हा पोलीस कस्टडीतुन फरार झाला असल्याची महिती मनमाड लोहमार्ग पोलिसांना औरंगाबाद एसपी ऑफिसकडून मिळाली होती. त्याचे लोकेशन मनमाड शहरातील रेल्वे स्थानक परिसर येत असल्याचे समजले होते. लोहमार्ग पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शोध घेतला. मात्र, या परिसरात तो कुठेही आढळून आली नाही. यानंतर हायकोर्ट परिसरात शोध घेत असताना त्याची ओळख पटली. यावेळी त्याने पळुन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोहमार्ग पोलिसांनी त्याला शिताफीने अटक केली. अटक करून त्याला औरंगाबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

पोलिसांशी हातापायी -

लोहमार्ग पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ताबडतोब शोध मोहीम सुरू केली. मात्र, आरोपी सुरवातीला मिळाला नाही. तो एका गाडीत बसलेला आढळला. त्याला संशय आल्याने तो पळून जात असताना पोलिसांनी पकडले. मात्र, तो पोलिसांशी हातापायी करुन पळत असताना त्याला पुन्हा अटक करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.