ETV Bharat / state

नाशिकमध्ये आता दिवसाला ११ हजार ऑक्सीजन सिलेंडरची निर्मिती; जिल्हा प्रशासनाचे सजग पाऊल

जिल्ह्यास १७.५ मेट्रीक टन इतका ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. दिवसाला ११ हजार ऑक्सीजन सिलेंडर निर्मिती केली जात आहे. गरजेपेक्षा पाच पटीने अधिक ऑक्सिजनची निर्मिती होत आहे. त्यामुळे वैद्यकीय व्यतिरिक्त उद्योगधंदे व इतर बाबींसाठीही ऑक्सीजन सध्या पुरवला जात आहे.

नाशिक कोरोना
नाशिक कोरोना
author img

By

Published : Mar 22, 2021, 11:02 PM IST

नाशिक - जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट झाला असून रोजच्या वाढत्या रुग्णसंख्येचा आलेख बघता आपत्कालीन परिस्थितीत ऑक्सीजन सिलेंडरची कमतरता भासू नये. यासाठी जिल्हाप्रशासन अलर्ट झाले आहे. जिल्ह्याला वैद्यकीय कारणांसाठी १९२५ जम्बो सिलिंडर इतका पुरवठा होत आहे. दिलासादायक बाब म्हणजे सद्यस्थितीत ११ हजार सिलिंडरची उपलब्धता करण्यात आली आहे.

..तर रुग्णांचीही संख्या वाढण्याची दाट शक्यता
जानेवारीपर्यंत अटोक्यात आलेल्या कोरोना संकटाने पुन्हा डोकेवर काढले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात १५ हजार पाॅझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या पाच दिवसापासुन अडीच हजार रुग्णांची भर पडली आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहे. चिंतेची बाब म्हणजे ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटरवरील रुग्णांचीही संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पालकमंत्री भुजबळ यांनी मागील आठवडयात बैठक घेत कोव्हिड सेंटर, व्हेंटिलेटर व आँक्सिजन पुरवरठा व्यवस्था पूर्ण क्षमतेने उभी करा, असे आदेश दिले होते. त्याचीच पूर्वतयारी म्हणून आता ऑक्सीजनची निर्मिती आणि उपलब्धता याची सांगड घातली जात आहे.

जिल्ह्यात सद्यस्थितीत १६ पुरवठादारांकडून ऑक्सीजन

जिल्ह्यास १७.५ मेट्रीक टन इतका ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. दिवसाला ११ हजार ऑक्सीजन सिलेंडर निर्मिती केली जात आहे. गरजेपेक्षा पाच पटीने अधिक ऑक्सिजनची निर्मिती होत आहे. त्यामुळे वैद्यकीय व्यतिरिक्त उद्योगधंदे व इतर बाबींसाठीही ऑक्सीजन सध्या पुरवला जात आहे. पुढील काळात रुग्णांची संख्या वाढल्यास ऑक्सीजनची कमतरता नको यासाठी जिल्हाप्रशासन अलर्ट झाले आहे.

हेही वाचा-सोमवारी राज्यात 24 हजार 645 कोरोनाबाधितांची नोंद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.