नाशिक - निवडणूक काळात ज्या लोकांनी बंडखोरी केली, ते निवडून येणार नाही असा विश्वास भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आहे. पण, ती रोखण्यासाठी प्रयत्न करणार असून, अर्ज माघारी घेण्याला वेळ असल्याने नंतर चित्र स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.
काही ठिकाणी बंडखोरांच्या समर्थकांनी पक्षाने पैसे देऊन तिकीटे वाटल्याचा आरोप केला होता. मात्र, महाजन यांनी हा दावा फेटाळून लावला. तसेच एकनाथ खडसे यांच्या नाराजीचा विषय संपला असून,खडसे यांची मुलगी त्यांच्याच संमतीने उमेदवार झाल्याचे महाजन यांनी सांगितले.
हेही वाचा तिकीट नाकारणे हा पार्लमेंट्री बोर्डाचा निर्णय, कदाचित नवी जबाबदारी देणार- गिरीश महाजन
अनेक ठिकाणी इच्छुकांची संख्या जास्त असल्याने पक्ष सर्वांना न्याय द्यायचा प्रयत्न करेल. त्यामुळे कुठेही नाराजी नसल्याचा दावा महाजन यांनी केला आहे.