ETV Bharat / state

नाशिक पालिकेच्या सभागृहातील बत्तीगुल; महासभा तहकूब

बराच वेळ वाट बघूनही विद्युत पुरवठा सुरू झाला नाही. त्यामुळे जनरेटर सुरू करणे अपेक्षीत होते. मात्र, तसे न झाल्याने विरोधकांचा रोष अधिकच वाढला. अखेर महापौर रंजना भानसी यांनी एक तासासाठी महासभा तहकूब केली.

author img

By

Published : Jul 19, 2019, 4:12 PM IST

महापालिका सभागृहातील विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने गोंधळ घालताना विरोधक

नाशिक - महापालिकेच्या महासभेत विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. गोंधळ बघून महापौर रंजना भानसी यांनी एक तासासाठी महासभा तहकूब केली. विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने पहिल्यांदाच महासभा तहकूब करण्याची नामुष्की सत्ताधारी भाजपवर ओढवली आहे.

महापालिका सभागृहातील विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने गोंधळ घालताना विरोधक

प्रत्येक गुरुवारी नाशिक महानगरपालिकेत महासभा घेण्यात येते. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी 11 वाजता महासभेचे कामकाज सुरू झाले. मात्र, सुरुवातीपासूनच सभागृहात विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे नगरसेवक तसेच उपस्थित अधिकाऱ्यांना महासभेचे कामकाज करणे जिकरीचे बनले होते. सभागृहातील पंखे बंद असल्याने अनेकांना घामाच्या धारा लागल्या होत्या. त्यामुळे सभागृहात थांबणे असह्य झाले होते. बराच वेळ वाट बघूनही विद्युत पुरवठा सुरू झाला नाही. त्यामुळे जनरेटर सुरू करणे अपेक्षीत होते. मात्र, तसे न झाल्याने विरोधकांचा रोष अधिकच वाढला. अखेर महापौर रंजना भानसी यांनी एक तासासाठी महासभा तहकूब केली.

स्मार्ट सिटी अंतर्गत महापालिकेकडून करोडो रुपयांचे काम शहरात सुरू आहेत. मात्र, दुसरीकडे त्याच कामांना मंजुरी देणारी महासभा अंधारात गेल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या तसेच प्रशासनाच्या अनागोंदी कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Intro:नाशिक म्हणे स्मार्ट सिटी होणार...पालिकेच्या महासभेतच बत्तीगुल....

Body:स्मार्ट सिटी कडे वाटचाल करणाऱ्या नाशिक महानगर पालिकेच्या प्रशासनाचा अनागोंदी कारभार समोर आला, आजच्या महानगर पालिकेच्या महासभेत विद्युत पुरवठा खंडित झाल्याने सभागृहात विरोधकांनी गोंधळ घालत महासभा तहकूब करण्याची मागणी केली, विरोधकांचा गोंधळ बघून महापौर रंजना भानसी यांनी एक तासासाठी महासभा तहकूब केली, विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पहिल्यांदाच महानगर पालिकेची महासभा तहकूब करण्याची नामुष्की सत्ताधारी भाजपवर ओढवली आहे..

दर गुरुवारी नाशिक महानगरपालिकेत महासभा घेण्यात येते,आज सुद्धा सकाळी 11 वाजता महासभेचे कामकाज सुरू झाले,मात्र सुरवाती पासूनच सभागृहात विद्युत पुरवठा खंडित असल्याने,महासभेचे कामकाज करणं,नगरसेवक तसेच उपस्थित अधिकाऱ्यांना जिकरीचे बनले होते,सभागृहातील पंखे बंद असल्याने उपस्थित अनेकांना घामाच्या धारा लागल्याने सभागृहात थांबणं असह्य झालं होतं,बराच वेळ होऊन सुद्धा विद्युत पुरवठा सुरूनं झाल्याने विरोधकांनी गोंधळ घालत सत्ताधारी भाजप आणि प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली, विद्युत पुरवठ खंडित झाल्या नंतर,जनरेटर सुरू होणे अपेक्षीत होते..मात्र तसं नं झाल्याने विरीधकांचा रोष अधिकच वाढला अखेर महापौर रंजना भानसी यांनी एक तासासाठी महासभा तहकूब केली,स्मार्ट सिटी अंतर्गत महानगर पालिके कडून करोडो रुपयांचे कामे शहरात सुरू असतांना दुसरीकडे त्याचं ह्या कामांना मंजुरी देणारी महासभा अंधारात गेल्यानं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या तसेच प्रशासनाच्या अनागोंदी कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत..
बाईट
अजय बोरस्ते विरोधी पक्ष नेता शिवसेना
टीप फीड ftp
nsk nmc electricity problems viu 1
nsk nmc electricity problems viu 2
nsk nmc electricity problems viu 3
nsk nmc electricity problems viu 4
nsk nmc electricity problems byte

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.