नाशिक - राज्यात अवकाळी पावसाने चांगलाच कहर केला असून त्यामुळे विविध पिकांची नासधूस झाली आहे. नाशिक जिल्ह्यालाही पावसाने चांगलेच झोडपले, सातत्याने पडणाऱ्या परतीच्या पावसाने द्राक्ष बागांसाह टोमॅटो, सोयाबीन, मका, भात, नागली वरईचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी भाजप नेते गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाची बैठक घेण्यात आली. यामध्ये प्रशासनाने ओल्या दुष्काळग्रस्त भागांचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, तसेच पीक विम्यासाठीची कर्जवसूली तातडीने थांबवावी यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले होते.
जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असून पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसाने द्राक्षमणी कुजायला सुरुवात झाली आहे. परिणामी मनी गळून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, मका पिकांना कोंब फुटून शेतीचे १०० टक्के नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात सर्वत्र अशीच परिस्थिती असून शेतकरी हवालदिल झाला आहे. यासाठी रविवारी गिरीश महाजन यांचा उपस्थितीत द्राक्ष बागायतदार संघाची बैठक घेण्यात आली. या बैठकित दुष्काळी परिस्थीती लक्षात घेता प्रशानाकडून पीकविम्याची कर्जवसूली तातडीने थांबविण्याची मागणी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून केली गेली. तसेच आमच्या अडचणी कळायला हव्यात म्हणून आम्ही तुमच्या द्राक्ष संघाच्या बैठकीत आलो आहे, असे म्हणत शेतकरी आक्रमक झाले होते.
दुष्काळी परिस्थितीवर बोलताना महाजन म्हणाले, येणाऱ्या २ दिवसात मुंबईत मुख्यमंत्र्यांचा उपस्थितीत महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाची बैठक घेणार आहे. तसेच पीकविम्याची तारीख वाढवता येईल यासाठी प्रयत्न करण्यात येतील. दुष्काळग्रास्त भागाचे पंचनामे 7 दिवसात पूर्ण करा, सुट्टी घेऊ नका अशा सुचना अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचेही महाजन यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - भाजपची भूमिका सध्या 'वेट अँड वॉच' - गिरीश महाजन
हेही वाचा - छटपूजे निमित्त गोदाकाठी उत्तर भारतीय भाविकांची गर्दी