नाशिक - दसरा दिनानिमित्त संपूर्ण भारतात रावण दहनाचा कार्यक्रम साजरा केला जातो. नवरात्रीच्या दशमीला दुर्गामातेने महिषासुराचा वध केला होता, म्हणून हा दिवस विजयाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. अशाच प्रकारे नाशिक शहरात रावण दहनाचा कार्यक्र पार पडला.
हेही वाचा - 'मंत्रालयाला आग लागली नव्हती; तर ती सुनिल तटकरेंनी लावली होती'
अन्यायाविरुद्ध कायम सत्याचा विजय व्हावा याचे प्रतीक म्हणून रावणाचे दहन केले जाते. तसेच नाशिकमध्येही अनेक ठिकाणी रावण दहन सोहळा पार पडला. अनेक वर्षाची परंपरा असलेल्या गंगापूर रोड येथील तुळजाभवानी मातेच्या मंदिर परिसरात ५१ फुट उंच रावणाच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. यावेळी ढोल ताशांच्या गजरात रावणाच्या प्रतिमेची पूजा करून मंत्रोच्चारात रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी या सोहळ्याचा नागरिकांनी केलेल्या रामाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता. तसेच अनेकांनी रावण दाहणाचा सोहळा आपल्या मोबाइलमध्ये संग्रहित केला.
हेही वाचा - 'पाहिजे तेवढे गुन्हे दाखल करा, शेवटपर्यंत जनतेसाठीच काम करणार'