ETV Bharat / state

Nashik News: आंतरपीक शेतीतून शोधला आर्थिक प्रगतीचा मार्ग; शेतकऱ्याची कलिंगडसह मिरतीतून लाखोंची कमाई - मल्चिंग पद्धतीने लागवड

शेतकऱ्यांना नेहमीच वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागते. बाजार भाव नेहमीच कमी मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचे नेहमीच नुकसान होते. परंतु यावर मात करत ममदापुरच्या एका शेतकऱ्याने आंतरपीक शेतीतून आर्थिक प्रगतीचा मार्ग शोधला आहे. मिरची व कलिंगडाची अंतरपीक शेती करून चांगले आर्थिक उत्पन्न मिळविले आहे.

Nashik News
शेतकरी जनार्दन उगले
author img

By

Published : Mar 26, 2023, 1:25 PM IST

प्रतिक्रिया देताना शेतकरी जनार्दन उगले

येवला : पिकाचे महत्व व मागणी लक्षात घेवून शेती केली तर शेतीत तोटा होत नाही. हे येवला तालुक्यातील एका शेतकऱ्याने सिद्ध केले आहे. ममदापूर येथील शेतकरी जनार्दन उगले यांनी मिरची पिकाचे महत्व व मागणी लक्षात घेतली. त्याने शेततळ्याच्या पाण्यावर एक एकर शेतीत मल्चिंग पद्धतीने कलिंगड पिकात तिखट अन् फिकी या दोन प्रकारच्या मिरचीची लागवड केली आहे. कांदा बाजार भावातील मंदी लक्षात घेऊन येवला तालुक्यातील ममदापूर येथील शेतकऱ्याने मिरची व कलिंगडाचे कलिंगडाची आंतरपीक शेती करून शेतकऱ्याने आर्थिक प्रगतीचा मार्ग शोधला आहे.

बाजारात मिरचीला चांगली मागणी : पिकाची योग्य निगा त्यांनी राखली आहे. मिरचीला फुले, कळी चांगल्या प्रमाणात आहे. मिरची तोडणीला देखील आली आहे. बाजारात मिरचीला चांगली मागणी आहे. फिकी मिरचीला 30 रुपये किलो तर तिखट मिरचीला 50-55 किलो इतका भाव मिळत आहे. अंतरपीक म्हणून घेतलेले कलिंगड देखील तयार झाले आहे. एकीकडे पारंपरिक पिकांची लागवड करण्याची धूम चालू असतांना अभ्यासू शेतकरी जनार्दन उगले यांनी मिरची आणि कलिंगड पिकाची लागवड केली आहे. या शेतकऱ्याला दोन ते अडीच लाख रुपये खर्च आला आहे. यातून त्याला चार ते साडेचार लाख रुपये मिरचीतून उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. कलिंगडातूनदेखील लाख रुपये उत्पन्न मिळेल.

चांगले आर्थिक उत्पन्न मिळू शकते : इतर पिकांच्या तुलनेत चांगले आर्थिक उत्पन्न मिळू शकते, असे त्यांनी सांगितले आहे. मल्चिंग पद्धतीने लागवड केल्याने कांदा पिकाच्या तुलनेत पाणी कमी लागत आहे. उन्हाळा सुरु होताच वन्य प्राणी हरीण, काळविट मानवी वस्तीकडे स्थलांतरित होत असतात. त्यामुळे पिकाला बाजूने सर्वत्र शेड नेटने कुंपण केले आहे. त्यामुळे पिकाचे संरक्षण होत आहे. ज्ञान आणि नियोजन यांचे मिश्रण कृतीत उतरवले तर, शेती क्षेत्रात नक्कीच यशस्वी होऊ शकतो. तिखट मिरची, झाली गोड अशीच प्रचिती शेतकऱ्यानी आपल्या नियोजनबद्ध शेतीतून सिद्ध केली आहे. असाच नवा प्रयोग करत वर्ध्यातील एका शेतकऱ्याने काळ्या गव्हाचे उत्पादन घेतले होते.

हेही वाचा : Black Wheat Production : काळ्या गव्हाचे उत्पादन; उत्पन्नाचा ठरतोय नवा स्त्रोत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.