ETV Bharat / state

नाशिक जिल्ह्यातील 621 ग्रामपंचायतींच्या 4 हजार 268 जागांवर प्रत्यक्षात निवडणूक

जिल्ह्यातील 621 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 5 हजार 463 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 4 हजार 268 जागांवर प्रत्यक्षात निवडणूक होणार आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्याने आता खऱ्या अर्थाने निवडणुकीला रंग आला आहे.

author img

By

Published : Jan 7, 2021, 10:48 PM IST

Nashik Gram Panchayat
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत

नाशिक - जिल्ह्यातील 621 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 5 हजार 463 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 4 हजार 268 जागांवर प्रत्यक्षात निवडणूक होणार आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्याने आता खऱ्या अर्थाने निवडणुकीला रंग आला आहे.

हेही वाचा - नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या लसीकरणाचा ‘ड्राय रन’ उद्याापासून - जिल्हाधिकारी

जिल्ह्यातील 621 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 16 हजार 668 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. छाननीत 443 अर्ज बाद झाले, तर 5 हजार 563 जणांनी माघार घेतली असून त्यामुळे आता 11 हजार 105 अर्ज शिल्लक राहिले असून त्यातील 1 हजार 727 जागा अविरोध झाल्या, तर सध्यास्थितीत 4 हजार 268 जागांवर प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे. त्यामुळे, गावखेड्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.

नांदगाव मधून सर्वाधिक माघार

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत येवला तालुक्यातून 573, तर नांदगाव तालुक्यातून सर्वाधिक 654 जणांनी माघार घेतली. त्यामुळे, सध्यास्थितीत येवल्यातील 69 ग्रामपंचायतींच्या 653 जागांसाठी 1 हजार 252 उमेदवार रिंगणात आहेत. तर, नांदगाव मधील 59 ग्रामपंचायतींच्या 527 जागांसाठी 1 हजार 14 उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक लढवणार आहे.

तालुकानिहाय अविरोध जागा

इगतपुरी - 11

येवला - 189

कळवण - 102

दिंडोरी - 163

निफाड - 148

त्र्यंबकेश्वर - 8

बागलाण - 163

देवळा - 61

नांदगाव - 144

मालेगाव - 210

नाशिक - 52

सिन्नर - 238

चांदवड - 138

एकूण - 1627

हेही वाचा - नाशिकच्या दुडगाव शिवारात बिबट्या जेरबंद, आणखी बिबटे असण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.