मनमाड (नाशिक)- मनमाडनजीक असलेल्या पानेवाडी इंधन प्रकल्पातून पेट्रोल भरून निघालेला टँकर पलटी झाल्याने त्यातून इंधन गळती सुरू झाली होती. भारत पेट्रोलियम कंपनीच्या मनमाड प्रकल्पा जवळ ही घटना घडली. टँकर मधून इंधन गळती होत असल्याने नाशिक-औरंगाबाद मार्गावरील वाहतूक करण्यात बंद आली. घटनास्थळी ताबडतोब अग्निशमन दलाच्या गाडया दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला.
भारत पेट्रोलियम कंपनीच्या प्रकल्पातून 12 हजार लिटर पेट्रोल घेऊन जाणारा टँकर पलटी झाल्याची घटना मनमाड पासून जवळ असलेल्या पानेवाडी येथे घडली. टँकर पलटी झाल्यानंतर त्यातून इंधन गळती सुरू झाल्याने नाशिक-औरंगाबाद मार्गावरील वाहतूक रोखून धरण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन टँकरवर फोमयुक्त पाण्याचा मारा करत इंधन गळतीवर नियंत्रण मिळविले इंधन गळती बंद झाल्यानंतर क्रेन आणून घटनास्थळावरून टँकर हटविण्यात आला त्यानंतर 3 तासा पासून बंद असलेली नाशिक-औरंगाबाद मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली
पानेवाडी येथे इंधनाचा पुरवठा करणारे मोठमोठे प्लांट आहेत या ठिकाणी भारत पेट्रोलियम इंडियन ऑइल हिंदुस्थान पेट्रोलियम यासह गॅस प्लांट आहे येथून उत्तर महाराष्ट्रभर इंधन पुरवठा करण्यात येतो. इंधन भरून जाणाऱ्या टँकरला अपघात झाला. मात्र, वेळीच सर्व उपाययोजना केल्याने मोठा अनर्थ टळला.