ETV Bharat / state

दिवाळी स्पेशल: कोरोना काळात उटण्याने अभ्यंगस्नान करणं फायदेशीर

भारतातील प्रत्येक सणाला एक वैशिष्ट्य आहे. प्रत्येक सणाला जोडून काही रूढी परंपरा आहेत. अशीच एक परंपरा म्हणजे दिवाळीत उटणे लावणे. दिवाळी सणात उटणे लावून अभ्यंगस्नान करण्याला महत्व आहे. तर कोरोना काळात उटणे लावण्याचे अनेक फायदे आहेत.

Cosmetics
उटणे
author img

By

Published : Nov 13, 2020, 9:16 AM IST

नाशिक - कोरोना काळात उटण्याने अभ्यंगस्नान करणं आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे मतं नाशिकचे प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ विक्रांत जाधव यांनी व्यक्त केलं आहे. दिवाळी निमित्त आयुर्वेदाचार्य डॉ. विक्रांत जाधव यांच्याशी ईटीव्ही भारत'ने केलेली खास बातचीत...

भारतातील प्रत्येक सणाला एक वैशिष्ट्य आहे. प्रत्येक सणाला जोडून काही रूढी परंपरा आहेत. अशीच एक परंपरा म्हणजे दिवाळीत उटणे लावणे. दिवाळीत उटणे लावून अभ्यंगस्नान करण्याला महत्व आहे. सुरवातीच्या काळात वनौषधींपासून बनवलेले उटणे दिवाळीत वापरले जातं असे. तसेच दिवाळीचा सण म्हणजे थंडीला सुरुवात. या काळात त्वचेची काळजी घ्यावी लागते. उटणे त्वचेसाठी उपयुक्त आहे. उटणे हे रजोगुणी, तेजोमय असल्याने ते अंगाला लावण्याची परंपरा आहे.

आयुर्वेदाचार्य डॉ. विक्रांत जाधव

आध्यात्मिक दृष्टीकोनातून -

दिवाळी पर्वात ब्रह्मांडात तेज, आप आणि वायूयुक्त चैतन्यप्रवाहांचे भूतलावर येण्याचे प्रमाण जास्त असल्याने वायूमंडलात देवत्वाचे प्रमाणही जास्त असते. या देवत्वरूपी चैतन्यकणांचे त्या-त्या घटकांतून ग्रहण होऊन त्याचा त्याला चैतन्य फलप्राप्तीच्या दृष्टीने अधिक लाभ व्हावा, यासाठी या काळात तेज, आप आणि वायूवर्धक उटणे अंगाला लावून देहाची चैतन्य ग्रहण करण्यातील संवेदनशीलता वाढवली जाते. हा कालावधी उटण्याच्या वापरास पोषक आहे.

उटण्याचे आयुर्वेदिक महत्व-

विविध नैसर्गिक घटकांपासून तयार झालेले उटणे हे एकप्रकारचे स्क्रबर असल्याचेच म्हणावे लागेल. हे उटणे थंडीतील चार महिने लावल्यास चेहऱ्याची त्वचा मुलायम होते. थंडीमुळे शरीराची त्वचा कोरडी होते. अनेकदा अशा कोरड्या त्वचेमुळे आगही होते. या समस्येपासून सुटका व्हावी, यासाठी उटण्याचा वापर केला जातो. उटण्यामधील आयुर्वेदिक घटकांमुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. ती मुलायम होण्यास सुरुवात होते. उटण्यामध्ये असणारी चंदन पावडर आणि हळद यामुळे त्वचा उजळण्यास मदत होते.

उटण्यात कुठल्या वनस्पतीचा वापर होतो -

उटण्यामध्ये चंदन, वेखंड, कात, रक्तचंदन, वाळा नागरमोथा यासारख्या वनस्पती आणि खोडांचा वापर केला जातो. हे घटक त्वचेला स्क्रबर म्हणून काम करतात. यामुळे काळवंडलेली त्वचा उजळण्यास मदत होते आणि चंदनामुळे शरीराला थंडावा मिळतो.

सुरकुत्या टाळणे शक्य-

वयानुसार त्वचेला येणाऱ्या सुरकुत्या हे अतिशय सामान्य आहे. उटण्यामुळे सुरकुत्या पडण्याचे प्रमाण कमी होते. हळदीमध्ये अ‍ॅन्टी एजिंग घटक असल्याने त्याचा त्वचेला फायदा होतो. त्वचा दीर्घकाळ टवटवीत दिसते. याशिवाय उटण्यात मध किंवा दूध लावल्यास त्याचा जास्त फायदा होतो. मध मिसळल्यास त्वचा मुलायम होण्यास मदत होते. तसेच चेहऱ्यावरील अनावश्यक केसांची वाढ रोखण्यास उटणे उपयुक्त.

कोरोना काळात उटणे प्रतिकारशक्ती वाढवण्यास फायदेशीर-

कोरोना काळात उटण्याने अभ्यंगस्नान केल्यास प्रतिकारशक्ती वाढते. उटण्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या आयुर्वेदिक वनस्पती ह्या त्वचेमार्फत शरीरात जातात आणि त्या प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. त्याबरोबर हिवाळ्यात तेल सकाळ, दुपार आणि संध्याकाळी गरम करून छातीला लावल्यासस कफ पासून संरक्षण होते. त्यामुळे हिवाळ्यात चार महिने उटणे आणि तेल वापरल्यास प्रतिकारशक्ती वाढून कोरोना पासून बचाव होवू शकतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.