नाशिक - पंढरपूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे अामदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पार्थ पवारांना उमेदवारी द्यायची की नाही, याचा निर्णय तेथील स्थानिक नेतृत्व घेईल. तसेच पक्ष जो उमेदवार देईल त्याचा प्रचार मी करेल, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. ते नाशिक दौर्यावर आले असताना मंगळवेढा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत पत्रकारांशी बोलत होते.
मागणी केली म्हणून लगेच पूर्ण होत नाही -
उमेदवारीचा निर्णय तिथले पालकमंत्री घेतील. कार्यकर्ते बोलून जातात, पण निर्णय स्थानिक नेते घेतात. उमेदवारी देताना स्थानिक परिस्थिती आणि कार्यकर्त्यांची मागणी लक्षात घेतली जाईल. कोणी मागणी केली म्हणून लगेच ती पूर्ण होईल, असे होत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच चंद्रकांत पाटलांना टोला लगवताना ते कोल्हापूरला जातील, पण कोल्हापुरकर त्यांचे स्वागत करतात का हे बघावे लागेल, असा टोलाही त्यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.
आपण संविधानाला धरून चालणारे -
राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत विलंब होत असेल तर सर्वसामान्य लोक पण आक्षेप घेतात. आपण संविधानाला धरून चालणारे आहोत. आपल्या पदाचा वापर गैरवापर करत असतील, तर हे लोकांना पटणार नाही, असे रोहित पवार यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - सर्वाधिक उंचीवरून उडणार्या पट्टेवाल्या बदकांचे सूर्याचीवाडी तलावावर आगमन