नाशिक - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून काळजी घेत जनजागृती केली जात आहे. शासन आदेशानुसार नाशिक शहरातील शाळा, महाविद्यालये, मॉल, चित्रपटगृह, जिम आणि उद्याने ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना विषाणूचे रुग्ण पुण्यात आढळल्याने आता पुण्याहुन नाशिकला महामंडळाच्या बसने येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची नोंद केली जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर नोंद घेतलेली माहिती जिल्हा रुग्णालयाला पाठवली जात असल्याचे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
या नोंदीमध्ये प्रवाशांचे नाव, पत्ता आणि मोबाइल नंबरची नोंद घेतली जात आहे. ज्या दिवसापासून पुण्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे, त्या दिवसापासून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांमध्ये ७० ते ८० टक्के घट झाली आहे. पुण्याहुन नाशिकला येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाच्या हाताला सॅनिटायझर लावले जात आहे.
हेही वाचा -नाशकात चक्क बाप्पाला मास्क, कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठीच्या दिशेने पाऊल