नाशिक - कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. जिल्ह्यातील तब्बल साडेतीन लाख मेट्रिक टन द्राक्षे निर्यातअभावी पडून आहेत. यामुळे द्राक्ष बागायतदाराच्या चिंतेत वाढ झाली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉगडाऊन करण्यात आला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय विमान सेवादेखील बंद ठेवण्यात आली आहे. याचा परिणाम नाशिकच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. निर्यात बंद असल्याने नाशिक जिल्ह्यात तब्बल साडेतीन लाख मेट्रिक निर्यातक्षम द्राक्ष पडून आहे.
कोरोनामुळे यंदा ३० टक्केहून अधिक द्राक्ष निर्यातीवर परिमाण झाला आहे. शेतकरी काही तरी पैसे मिळावे, म्हणून ६० ते ७० रुपये किलोची निर्यातक्षम द्राक्षे १८ ते २० रुपयांनी रस्त्यावर विकत आहेत. तसेच काही शेतकरी बेदाण्याकडे वळले आहे. पण त्यात ही त्यांना अडचणी येत आहेत. बेदाणे बनवण्यासाठी लागणारे डिपिंग ऑइलचा तुटवडा निर्माण झाला आहे.
दरवर्षी नाशिक जिल्ह्यातून जगभरात द्राक्षाची निर्यात केली जाते. शेतकरी प्रतिकूल परिस्थितीत अनेक संकटावर मात करून गुणवत्तापूर्वक द्राक्षाचे उत्पादन घेतो. यावर्षी शेतकऱ्यांनी अवकाळी पावसातून आपल्या बागा कशाबशा वाचवल्या आहेत. चार एप्रिलपर्यंत नाशिक जिल्ह्यातून १ लाख ९ हजार मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली. त्यानंतर आता साडेतीन लाख मेट्रिन टन द्राक्ष निर्यातीसाठी तयार आहेत. पण विनानसेवा बंद आहे. यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा - लॉकडाऊन : 'आर्यावर्त' सोसायटी समितीतर्फे दररोज 200 गरजूंना जेवण
हेही वाचा - कोरोना इफेक्ट : नाशिकमध्ये अडकले सुमारे 500 मालवाहतूक ट्रक; चालकांना लागलीये घराची ओढ