ETV Bharat / state

पुनंद पाणीप्रश्नी बैठक निष्फळ; शेतकरी पाईपलाईन तोडण्याच्या पवित्र्यात - drought nashik

जिल्हास्तरीय लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आज(मंगळवार) दोन तास झालेली बैठक निष्फळ ठरली. पाईपलाईन शेतकरी उखडून टाकतील, असा इशारा कळवण, देवळा, सटाणा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.

पुनंद पाणीप्रश्नी बैठक
author img

By

Published : Jun 4, 2019, 7:22 PM IST

नाशिक - जिल्ह्यातील पुनंद पाणी प्रश्न चांगलाच पेटला आहे. जिल्हास्तरीय लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आज(मंगळवार) दोन तास झालेली बैठक निष्फळ ठरली. सटाणा शहरासाठी ३३ कि.मी पाण्याची पाईपलाईन टाकुन व्यवस्था व्हावी यासाठी ५५ कोटी मंजूर झाले आहेत. मात्र, पाइपलाइनद्वारे पाणी न नेता कालव्याद्वारे पाणी घेऊन जा, अन्यथा पाईपलाईन कोणत्याही बंदोबस्तात करा, पाईपलाईन शेतकरी उखडून टाकतील, असा इशारा कळवण, देवळा, सटाणा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.

पुनंद पाणीप्रश्न

नाशिकच्या कळवण, देवळा आणि सटाणा तालुक्यातील नागरिकांसह शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न दूर व्हावा यासाठी कळवण येथे पुनंद धरणाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यासाठी कळवणच्या शेतकऱ्यांकडून शेकडो एकर जमिनी घेण्यात आल्या. १२० एमसीएफटी इतका पाणीसाठा या धरणात होत असतो. आता याच धरणातून पाणी सटाण्यासाठी देण्याची वेळ आली आहे. सध्या कसमादे भागात तीव्र पाणीटंचाई आहे. त्यामुळे सटाणा शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी या धरणातून पाणी दिले जाणार आहे.

पाणी देण्यासाठी ३३ किलोमीटरची पाईपलाईन केली जाणार असून त्यासाठी ५५ कोटीचा निधी मंजूर केला आहे. मात्र, या कळवण, देवळा व सटाणा तालुक्‍याच्या काही शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. पाणी न्यायचे असेल तर पाटचारीने घेऊन जा, अन्यथा कोणत्याही बंदोबस्तात पाईपलाईन करा, ती शेतकरी उखडुन टाकतील, असा इशारा संघर्ष समितीचे अध्यक्ष देविदास पवार यानी दिला.

मात्र, यासर्व प्रकरणावर सरकारी पातळीवरची प्रक्रिया झाली असून सरकारी नियमानुसार पाईपलाईन करायची तयारी जिल्हा प्रशासन करत आहे. बाष्पीभवन आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पाईपलाईनच होईल, असे संकेतही खासदार सुभाष भामरे यांनी दिले आहेत. दरम्यान, हा प्रश्न निकाली निघावा म्हणून शेतकऱ्यांनी संघर्ष समिती करत वेळोवेळी बैठका घेतल्या आहेत. मात्र, तरीही प्रश्न निकालीही निघालेला नाही. आजची बैठकही निष्फळ ठरली. एकंदरीतच शेतकरी आपल्या निर्णयावर ठाम असल्याने येत्या काळात पाण्यावरून संघर्ष अधिक तीव्र होणार आहे.

Intro:नाशिक जिल्ह्यातील पुनंद पाणी प्रश्न चांगलाच पेटलाय जिल्हास्तरीय लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आज दोन तास झालेली बैठक निष्फळ ठरलीय.. सटाणा शहरासाठी 33 किलोमीटर पाण्याची पाईपलाईन टाकुन व्यवस्था व्हावी यासाठी 55 कोटी मंजूर झाले आहे मात्र पाइपलाइनद्वारे पाणी न नेता कालव्याद्वारे पाणी घेऊन जा अन्यथा पाईपलाईन कोणत्याही बंदोबस्तात करा ती पाईपलाईन शेतकरी उखडून टाकतील असा इशारा कळवण,देवळा,सटाणा, शेतकऱ्यांनी दिलाय ..

Body:नाशिकच्या कळवण, देवळा आणि सटाणा तालुक्यातील नागरिकांसह शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न दूर व्हावा यासाठी कळवण येथे पूनंद धरणाची निर्मिती करण्यात आली होती त्यासाठी कळवणच्या शेतकऱ्यांकडून शेकडो एकर जमिनी घेण्यात आल्या 120 एमसिएफटी इतका पाणीसाठा या धरणात होत असतो आता याच धरणातून पाणी देण्याची वेळ आलीय सध्या कसमादे भागात तीव्र पाणीटंचाई आहे त्यामुळे सटाणा शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी या धरणातून पाणी दिले जाणार आहे त्यासाठी 33 किलोमीटरची पाईपलाईन केली जाणार असून त्यासाठी 55 कोटी चा निधी मंजूर केला आहे मात्र या कळवण देवळाच्या व काही सटाणा तालुक्‍याच्या शेतकऱ्यांनी विरोध केला आहे पाणी न्यायचे असेल तर पाटचारीने घेऊन जा अन्यथा कोणताही बंदोबस्तात पाईपलाईन करा ती शेतकरी करून उखडुन टाकतील असा इशारा संघर्ष समितीचे अध्यक्ष देविदास पवार यानी दिलाय..

Conclusion:मात्र या सर्व प्रकरणावर सरकारी पातळीवरची प्रक्रिया झाली असून सरकारी नियमानुसार पाईपलाईन करायची तयारी जिल्हा प्रशासन करत आहे बाष्पीभवन आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पाईपलाईनच होईल असे संकेतही खासदार सुभाष भामरे यांनी दिलेय दरम्यान हा प्रश्न निकाली निघावा म्हणून शेतकऱ्यांनी संघर्ष समिती करत वेळोवेळी बैठका घेतल्या आहेत मात्र तरीही प्रश्न निकालीही निघालेल्या नाही आजची बैठकही निष्फळ ठरली एकंदरीतच शेतकरी आपल्या निर्णयावर ठाम असल्याने येत्या काळात पाण्यावरून कसमादेत पाणी संघर्ष अधिक तीव्र होणार आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.