नाशिक - देवळा तालुक्यातील मेशी शिवारात मंगळवारी (दि. 28 जानेवारी) एसटीबस आणि रिक्षात भीषण अपघात झाला होता. बस रिक्षासह विहिरीत कोसळली होती. त्या ठिकाणच्या प्रत्यक्षदर्शींनी चालकांनी बस सावकाश चालवावी, अशी मागणी केली.
मंगळवारी मालेगावहून देवळा येथे जाणारी भरधाव एसटीबसचा टायर फुटल्याने चालकाचा बसवरील नियंत्रण सुटला होता. त्याचवेळी समोरून देवळाहून मालेगावकडे येणाऱ्या रिक्षाला बस धडकली आणि फरफटत जवळ असलेल्या विहिरीत रिक्षासह पडली होती. यात रिक्षातील 9 व बसमधील 15, असे 26 जणांचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा - 'असंवेदनशील पालकमंत्री व परिवहन मंत्री आले आणि गेले'
घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार बसचा वेग जास्त असल्याने चालकाना बस नियंत्रित करता आली नाही. त्यामुळे हा भीषण अपघात घडला. त्यामुळे चालकांनी बसचा वेग नियंत्रित ठेवावा, अशी मागणी प्रत्यक्षदर्शींकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा - नाशिक बस दुर्घटना : 26 जणांचा मृत्यू.. शेतकरी धावले होते मदतीला