मनमाड (नाशिक) - कांद्याला भाव मिळूनही शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही. उत्पादन शुल्कही निघत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला असून किमान 4 हजार रुपये भाव मिळाला तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल व त्यांच्या पदरी काही पडेल अशी मागणी शेतकरी वर्गातर्फे करण्यात येत आहे.
कांद्याला एकरी जवळपास 50 हजार रुपये खर्च येतो. सध्या अतिवृष्टीचा फटका कांदा पिकाला बसला असून चाळीत साठवून ठेवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडला आहे. यामुळे कांद्याची आवक कमी झाल्याने कांद्याच्या भावात सुधारणा झालेली आहे. मात्र, ही भाववाढ होऊनशी बळीराजाच्या पदरी निराशाच आहे. यामुळे कांद्याला किमान 4 हजार भाव मिळावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.