नाशिक - कोरोना विषाणूचा विविध देशांमध्ये वाढला असलेला संसर्ग लक्षात घेता विविध पातळ्यांवर कोरोना बाबत दक्षता घेण्याच्या दृष्टीने शासनाने नियोजन सुरू केले आहे. या अंतर्गत विशेष भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. सदर भरारी पथकाने शहरातील गोळे कॉलनी येथील हॉलसेल औषध विक्रेत्याकडे 1 लाख 6 हजार 210 रुपये किंमतीचा बनावट सॅनिटाझरचा साठा जप्त करण्यात आला आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक व सह आयुक्त औषध व सहनियंत्रक वैद्यमापक शास्त्र यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष भरारी पथकाने ही कारवाई केली आहे. सदर भरारी पथकाने शहरातील गोळे कॉलनी येथे हॉलसेल औषध विक्रेत्यांची व किरकोळ विक्रेत्यांच्या दुकानांच्या तपासण्या केल्या. यामध्ये राहुल इंटरपाईजेस गोळे कॉलनी आणि अशापुरी एजन्सी गोळे कॉलनी या दोन ठोक विक्रेत्यांकडे बनावट सॅनिटाझर आढळले आहेत.
हेही वाचा-कोरोनामुळे श्री. काळाराम मंदिरात रामनवमी उत्सवाचे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द
औषध निरीक्षक सु सा देशमुख यांनी एकूण 1 लाख 6 हजार 210 रुपयांचा सॅनिटाझरचा बनावट साठा जप्त केला आहे. याबाबत चौकशी सुरू असून योग्य कारवाई करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.