ETV Bharat / state

नाशिकमध्ये पूर्व वैमनस्यातून टोळीने केला दोघांवर प्राणघातक हल्ला - two friends

जुने नाशिक भागातील तिवंधा चौक परिसरात चार त पाच जणांच्या टोळीने दोघा मित्रांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यामध्ये दोघे मित्र गंभीर जखमी झाले आहेत.

हल्ल्यानंतर झालेली तोडफोड
author img

By

Published : Aug 1, 2019, 8:00 AM IST

नाशिक - जुने नाशिक भागातील तिवंधा चौक परिसरात चार त पाच जणांच्या टोळीने दोघा मित्रांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यामध्ये दोघे मित्र गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या घटनेमुळे शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असल्याचे दिसत आहे. तसेच स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुने नाशिक येथील तिवंधा चौक परिसरात राहणारे मित्र विराज जंगम आणि रोहित पेखळे हे रात्री जेवण करून घराबाहेरील कट्ट्यावर गप्पा मारत बसले होते. यावेळी आलेल्या चार ते पाच जणांच्या टोळक्याने चॉपर, लोखंडी गजाने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. हल्ल्यामध्ये दोघे गंभीर झाले. तर घटनेनंतर संशयित तेथून फरार झाले. स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली व दोघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. हल्ला करणाऱ्यांमध्ये संशयित सौरभ मराठे, गणेश खैरे, अशोक खैरे, यश खैरे यांची नावे समोर आली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

हा हल्ला पूर्व वैमनस्यातून झाल्याचे बोलले जात आहे. तर नाशिक पोलिसांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शहरातील शंभरहून अधिक सराईत गुन्हेगारांवर तडीपारीच्या कारवाई केली आहे. तरी नाशिकमध्ये गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Intro:नाशिकमध्ये पूर्व वैमनस्यातुन टोळक्याकडून दोघां मित्रांवर प्राणघातक हल्ला...

Body:नाशिकच्या जुने नाशिक भागातील तिवंधा चौक परिसरात दोघा मित्रांवर टोळक्याने प्राणघातक हल्ला चढवला,चार ते पाच जणांच्या टोळक्याने चोपर,लोखंडी रोड, काठ्या ने चढवलेल्या हल्ल्यात दोघे मित्र गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत,ह्या घटनेमुळे नाशिक मध्ये गुन्हेगारीने पून्हा एकदा डोकं वर काढले असून स्थानिकांन मध्ये दहशतीचे वातावरण आहे....

पोलिसांन कडून मिळालेल्या माहिती नुसार जुने नाशिक येथील तिवंधा चौक परिसरात राहणारे मित्र विराज जंगम आणि रोहित पेखळे हे रात्री जेवण करून घराबाहेरील कट्ट्यावर गप्पा मारत बसले होते,ह्यावेळी आलेल्या चार ते पाच जणांच्या टोळक्याने चोपर,लोखंडी गजाने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला,ह्यात हे दोघे गंभीर झाले,घटनेनंतर हे संशयित तेथून फरार झाले,स्थानिक नागरिकांनी ह्या घटनेची माहिती पोलीसांना देत ह्या दोघांना उपचारा साठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले,घटनेची माहिती मिळताच पोलीस उप आयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या सह पोलीस अधिकाऱ्यांनी घटना स्थळी भेट देऊन माहिती घेतली,ह्यात हल्ला करणारे संशयित सौरभ मराठे,गणेश खैरे, अशोक खैरे,यश खैरे यांची नावे समोर आली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे,
नाशिक पोलिसांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शहरातील शंभर हुन अधिक सराईत गुन्हेगारांवर तडीपारीच्या कारवाई केली आहे...हा हल्लाबपूर्व वैमनस्यातुन झाल्याचे बोलले जातं असलं तरी नाशिक मध्ये गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोकंवर काढल्याचे चित्र आहे...

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.