येवला (नाशिक) - मालमत्ता थकबाकी न भरल्याने मक्याचे गोडाऊन येवला नगरपालिकेने सील केले आहे. ( Yeola Nagar Panchayat Godawn Seal ) येवला नगरपालिका हद्दीतील नांदेसर शिवारातील गोडाऊन मालकाकडे 33 लाख 44 हजार 510 रुपये थकबाकी आहे. वारंवार नोटिसा देऊन देखील थकबाकी न भरल्याने येवला नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सदर मक्याचे गोडाऊन सील केले आहे.
येवला नगरपालिका हद्दीतील नांदेसर शिवारातील नम्रता अमोल ठाकूर यांच्याकडे 16 लाख 79 हजार 897 रुपये तसेच आशाबाई प्रभाकर ठाकूर यांच्याकडे 16 लाख 64 हजार 613 रुपये असे एकूण 33 लाख 44 हजार 510 रुपये सन 2021/2022 सन अखेर थकबाकी असून ती भरत नसल्याने मक्याचे गोडाऊन सील करण्यात आले आहे.
थकबाकीमुळे गोडाऊन सील -
नगरपरिषद हद्दीमध्ये नांदेसर शिवारामध्ये नामांकित असलेल्या मक्का व्यापाराचे गोडाऊन असून या व्यापाऱ्यांनी नगरपालिकेचे 33 लाख 44 हजार पाचशे दहा रुपये मालमत्ता थकबाकीदार थकविले असून नगरपालिकेच्या वसुली कर्मचारी वारंवार थकबाकी भरण्यासंदर्भात नोटीस देऊन देखील संबंधित गोडाऊन मालकांनी थकबाकी न भरल्याने अखेर नगरपालिकेच्या वसुली पथकाने के गोडाऊन सील केले असल्याची महिती नगरपालिका वसुली अधिकाऱ्यांनी दिली आहे.